Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवडमध्ये काँग्रेसला बळ: राष्ट्रवादी आणि मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांचा ‘हात’ हाती!

पिंपरी-चिंचवडमध्ये काँग्रेसला बळ: राष्ट्रवादी आणि मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांचा ‘हात’ हाती!

जन्नतबी सय्यद आणि आशा बोरकर समर्थकांसह काँग्रेसमध्ये; आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला फायदा होण्याची शक्यता. (मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवडमध्ये काँग्रेसला बळ: राष्ट्रवादी आणि मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश!

 

 

शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यालयात पक्षप्रवेश सोहळा; स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना प्राधान्य देण्याची ग्वाही!

 

पिंपरी, दि. ३० जून २०२५: पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली आज (सोमवार, ३० जून) काँग्रेस पक्ष कार्यालय, खराळवाडी पिंपरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) महिला शहर उपाध्यक्ष सौ. जन्नतबी सय्यद आणि मनसेच्या महिला पदाधिकारी सौ. आशा रमेश बोरकर यांनी आपल्या समर्थकांसह काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात काँग्रेस पक्षाची ताकद वाढताना दिसत आहे.


 

काँग्रेसमध्ये नवचैतन्य: महिलांना मिळणार प्राधान्य!

 

पिंपरी-चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीमधून काँग्रेसला विधानसभेची तिकीटं न मिळाल्याने काही काळ पक्षात निरुत्साही वातावरण निर्माण झाले होते. मात्र, शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वामध्ये आता मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश सुरू झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुकांमध्ये महिलांना जास्त प्राधान्य देण्यात येईल, असा विश्वास डॉ. कैलास कदम यांनी यावेळी व्यक्त केला.


 

यांचाही काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश:

 

सौ. जन्नतबी सय्यद आणि सौ. आशा रमेश बोरकर यांच्यासोबत सकिना शेख, सानिका सोनवणे, राबिया शेख, कविता चांदवड, वैशाली हिरे, स्वाती गजरे, सोनाली शिंदे, मनाली साळी, तरन्नुम शेख, परविन शेख, आयान शेख, राकेश साठे, राजेंद्र महाजन यांनीही काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.

या पक्षप्रवेश सोहळ्याला काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब मुगुटमल, अमर नाणेकर, मयूर जयस्वाल, अबूबकर लांडगे, प्रा. किरण खाजेकर, ज्ञानेश्वर मलशेट्टी, विश्वनाथ जगताप, विठ्ठल शिंदे, बाबासाहेब बनसोडे, अर्चना राऊत, निर्मला खैरे, अनिता चव्हाण, शीतल कोतवाल, ज्योती गायकवाड, मजहर खान, ॲड. करिम पूनावाला, वसंत वावरे, पीरमोहम्मद पठाण, आलम हुसेन, हाजी अब्दुल रज्जाक शेख, हाजी मोहम्मद अली शेख, हुजेफा पिंजारी, सोनु शेख, आशुतोष खैरे आदी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या पक्षप्रवेशांमुळे पिंपरी-चिंचवड काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला याचा फायदा होण्याची शक्यता आहे.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment