news
Home अकोला सण-उत्सवांच्या तोंडावर मूर्तिजापूर पोलीस सज्ज: शहरात ‘रूट मार्च’ने दिली शांततेची ग्वाही!

सण-उत्सवांच्या तोंडावर मूर्तिजापूर पोलीस सज्ज: शहरात ‘रूट मार्च’ने दिली शांततेची ग्वाही!

संवेदनशील भागातून संचलन; कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस दल सतर्क, नागरिकांना सहकार्याचे आवाहन. (मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

 

मूर्तिजापूर शहरात सणांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा ‘शक्तीप्रदर्शन’ रूट मार्च!

 

 

मोहरम, आषाढी एकादशी, श्रावण मासानिमित्त कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ३ अधिकारी व २६ अंमलदारांचा शहरात संचलन!

 

मूर्तिजापूर, प्रतिनिधी (विलास सावळे), दि. २ जुलै २०२५: आगामी मोहरम, आषाढी एकादशी, आणि श्रावण मास उत्सव यांच्या पार्श्वभूमीवर मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कायदा व सुव्यवस्था अखंडित राहावी, यासाठी आज (बुधवार, २ जुलै) रोजी पोलिसांकडून ‘रूट मार्च’ (संचलन) काढला. शहरातील विविध महत्त्वाच्या मार्गांवरून काढण्यात आलेल्या या संचलनामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.


शहराच्या मुख्य आणि संवेदनशील भागातून संचलन

 

हा रूट मार्च मूर्तिजापूर पोलीस स्टेशनपासून सुरू होऊन शहरातील महत्त्वाच्या आणि काही संवेदनशील मानल्या जाणाऱ्या भागांमधून काढण्यात आला. यामध्ये जळमकर चौक, भगतसिंग चौक, महाराज चौक, टांगा चौक, रामाश्रय चौक, काळा गोटा, पोळा चौक (जुनी वस्ती), पंचशील वाडी, महाराज चौक, भगतसिंग चौक, लक्कडगंज आणि पुन्हा पोलीस स्टेशन या मार्गांचा समावेश होता. या संचलनामुळे पोलीस प्रशासनाची सज्जता आणि उपस्थिती नागरिकांना स्पष्टपणे दिसून आली.


पोलिसांचा मोठा सहभाग आणि शांततेचे आवाहन

 

या रूट मार्चमध्ये मूर्तिजापूर शहर ठाणेदार अजित जाधव साहेब, API अनिल पवार, PSI गणेश सूर्यवंशी हे अधिकारी, तसेच ASI नंदकिशोर टिकर, H.C. सुरेश पांडे, P.C. नामदेव आले यांच्यासह एकूण २६ पोलीस अंमलदार यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. सण-उत्सवांच्या काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि शांतता व सलोखा कायम राहावा, यासाठी पोलीस दल सतर्क असल्याचे या संचलनातून दाखवून देण्यात आले. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करून सलोखा राखण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!