news
रहाटणीत नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची धडक कारवाई! गजानन नगरमधील ‘डेथ ट्रॅप’ ठरणारी ड्रेनेज समस्या २४ तासांत केली गुलपिंपरी-चिंचवडमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ५ कोटींची फसवणूक करणारे आहेरकर कुटुंब नेवासामधून अटक! आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाईजागतिक बाजारात सोने गडगडले! स्पॉट गोल्ड ४,१६९ डॉलरवर; अमेरिकन व्याजदर आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार चिंतेतभारतातील म्युझिक इंडस्ट्रीला केंद्र सरकारचे मोठे गिफ्ट; ‘PPL India’ ला मिळाली अधिकृत कॉपीराईट सोसायटी म्हणून मान्यता!मोरवाडीत पिंपरी-चिंचवड भाजपचा भव्य नियुक्ती सोहळा; भुजबळ, नेमाने, भालेराव, मोरे आणि शिर्के यांच्यावर नव्या आघाड्यांची जबाबदारी!
Home पुणे मावळमध्ये ‘फुलचंद’ पानाच्या नशेचा विळखा: तरुणाईच्या आरोग्याला गंभीर धोका, गांजासदृश पदार्थांचा संशय!

मावळमध्ये ‘फुलचंद’ पानाच्या नशेचा विळखा: तरुणाईच्या आरोग्याला गंभीर धोका, गांजासदृश पदार्थांचा संशय!

कामशेत पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन सतर्क; पानाच्या टपऱ्यांवर कारवाईचे संकेत, पालकांनाही सतर्कतेचे आवाहन. (मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

मावळातील तरुणाई ‘फुलचंद’ नशायुक्त पानाच्या आहारी: आरोग्याला गंभीर धोका!

विड्यामध्ये गांजाचा समावेश असल्याचा संशय; पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाईचे संकेत!

टाकवे बुद्रुक, प्रतिनिधी :- अजय यादव, पुणे ग्रामीण, दि. ८ जुलै २०२५ : मावळ तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक विशिष्ट प्रकारची सुस्ती, नशा आणि धुंदी देणारा, गांजासारखा पदार्थ विड्याच्या पानात मिसळून त्याची सर्रास विक्री केली जात आहे. मावळातील अनेक शहरांमधील टपऱ्यांवर याला ‘फुलचंद’ पान म्हणून विकले जात असून, तरुणांमध्ये त्याची एक प्रकारे ‘क्रेझ’ तयार झाली आहे. अनेक तरुणांना या नशायुक्त ‘फुलचंद’ पानाचे जणू व्यसनच लागले आहे, ज्यामुळे त्यांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे.

‘फुलचंद’ पानाची वाढती क्रेझ आणि व्यसनाधीनता:

मावळातील अनेक शहरांमध्ये चौकाचौकांमधील पानाच्या टपरीवर हे विड्याचे पान सहज उपलब्ध असल्याने ते खाण्यासाठी तरुणांमध्ये चढाओढ लागत आहे. हे पान खाणाऱ्यांमध्ये शहरी भागांतील अल्पवयीन मुलांसह ग्रामीण भागांतील मुलांचाही समावेश पाहायला मिळत आहे. काही विद्यार्थीही या पानामुळे व्यसनाधीन झालेले दिसत आहेत, जी अत्यंत चिंताजनक बाब आहे. या नशायुक्त ‘फुलचंद’ पानाची किंमत २५ ते ३० रुपये इतकी असल्याचे बोलले जात आहे.

एखाद्या तरुणाने हे पान प्रथमच सेवन केले, तर त्यास अति प्रमाणात नशा येते; तर काहींना चक्करही येते. मात्र याचा दुष्परिणाम थेट तरुणांच्या आरोग्यावर होत असल्याची भीती व्यक्त होत आहे.

पानात काय असते?

या पानामध्ये तंबाखू पावडर, सुपारी, कात, चुना, इलायची आणि एक अनोळखी नशायुक्त पदार्थ टाकला जातो. या पानाचा वास सुगंधित असून, हे पान खाल्ल्यानंतर काही वेळासाठी नशा येते, असे एका पान खाणाऱ्या तरुणाने सांगितले. हा अनोळखी नशायुक्त पदार्थ गांजासारखाच असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

आरोग्यावर गंभीर परिणाम आणि कर्करोगाचा धोका:

या नशायुक्त पानांच्या दीर्घकाळ सेवनामुळे तरुणांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. भविष्यात या पानाचा विडा खाणाऱ्या तरुणांना कर्करोगासारख्या भयंकर आजारांचा सामना करायला लागण्याची शक्यताही नाकारता येत नाही, अशी भीती आरोग्य तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

प्रशासनाकडून कारवाईचे संकेत:

या गंभीर प्रकरणावर प्रशासनाने लक्ष दिले आहे.

  • नारायण सरकते, सहायक आयुक्त, अन्न आणि औषध प्रशासन यांनी माहिती दिली की, “ही कारवाई एनडीपीएस (NDPS) कायद्याअंतर्गत करता येते. आधी सहाय्यक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक असताना त्याविरोधात कारवाया झाल्या आहेत. गांजासारखे काहीतरी पदार्थ मिश्रित करून ही पाने विकली जातात, अशी माहिती आहे.”
  • रवींद्र पाटील, पोलिस निरीक्षक, कामशेत पोलिस ठाणे यांनी म्हटले आहे की, “नशायुक्त ‘फुलचंद’ आणि अन्य नशायुक्त पदार्थांविरुद्ध याआधी कारवाया झाल्या आहेत. कामशेतमध्ये कोणत्या पान टपऱ्यांवर ही पाने विकली जातात त्याबद्दल कल्पना नाही. या प्रकारे नशायुक्त पानांची विक्री करणाऱ्या पानटपरी चालकांची माहिती आम्हाला दिली, तर कारवाई केली जाईल.”

या गंभीर समस्येवर तातडीने कठोर कारवाई करण्याची आणि तरुणाईला या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी जनजागृती करण्याची गरज आहे. पालकांनीही आपल्या मुलांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!