news
पिंपरीतील ‘श्रीटिकेल’ कंपनीच्या २७५ कामगारांनी केले रक्तदान; ‘वायसीएम’ मधील गरीब रुग्णांना मिळणार जीवनदान!पिंपरी-चिंचवडमधील १३४ मनपा शाळांमध्ये सुट्टीच्या दिवशी घुमला ‘ओंकार’ नाद! आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभागपिंपरी-चिंचवड मनपा आणि योग विद्या धामच्या संयुक्त विद्यमाने ‘एक पृथ्वी, एक आरोग्य’ संकल्पनेवर भव्य योग सोहळा!रहाटणीत आंतरराष्ट्रीय योगदिनाचा उत्साह! आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी महाराज उद्यानात सामूहिक योगसाधनापिंपरी मनपा मुख्यालयाबाहेर ‘मॅक्स मंथन’च्या बातमीचा महाप्रभाव! ‘डेथ ट्रॅप’ ठरलेले ड्रेनेज चेंबर सुट्टीच्या दिवशी युद्धपातळीवर दुरुस्त
Home पिंपरी चिंचवड एआयच्या युगात यशस्वी व्हायचंय? ‘या’ टिप्स फॉलो करा!

एआयच्या युगात यशस्वी व्हायचंय? ‘या’ टिप्स फॉलो करा!

पिंपरी चिंचवड विद्यापीठातील 'दीक्षारंभ' सोहळ्यात विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन; स्वयं-शिक्षणावर भर देण्याचे आवाहन. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

कौशल्ये आत्मसात करा, तंत्रज्ञानाच्या आव्हानांना सामोरे जा’ – कांचन भोंडे

 

 

पिंपरी चिंचवड विद्यापीठात ‘दीक्षारंभ’ समारंभ उत्साहात संपन्न; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

 

२५ ऑगस्ट २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी ,  प्रतिनिधी शाम सोनवणे– आयटी अभियांत्रिकीच्या क्षेत्रात झपाट्याने होत असलेल्या बदलांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी सतत नवीन कौशल्ये आत्मसात केली पाहिजेत, असे मार्गदर्शन सोगिती कॅपजेमिनीच्या वरिष्ठ संचालक कांचन भोंडे यांनी केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (PCET) वतीने संचालित पिंपरी चिंचवड विद्यापीठात (PCU) नवीन शैक्षणिक वर्षाच्या निमित्ताने आयोजित ‘दीक्षारंभ’ समारंभात त्या बोलत होत्या.


स्व-शिक्षणावर भर देणे काळाची गरज

 

आज कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), चॅट बॉट आणि चॅट जीपीटी यांसारख्या तंत्रज्ञानामुळे दर तीन-चार वर्षांनी तंत्रज्ञानाचे स्वरूप बदलत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी फक्त अभ्यासक्रमावर अवलंबून न राहता, स्वयं-शिक्षणावर भर दिला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही स्वयं-प्रेरणेने अभ्यास करत नाही, तोपर्यंत ज्ञानाच्या कक्षा रुंदावणार नाहीत, असे भोंडे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

यावेळी पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे आणि पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पीसीईटी शैक्षणिक समूह गेल्या तीस-पस्तीस वर्षांपासून विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवत असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार शिक्षण देणारी संस्था म्हणून नावलौकिक मिळवला आहे, असे हर्षवर्धन पाटील म्हणाले.


अभ्यास आणि आरोग्य यांचा समन्वय

 

पाटील यांनी विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासावरच नव्हे, तर शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीवरही भर देण्याचे आवाहन केले. तसेच, पालकांनी नियमितपणे प्राध्यापकांशी संवाद साधून आपल्या पाल्याच्या प्रगतीची माहिती घ्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला.

या समारंभात प्रथम वर्ष अभियांत्रिकीमध्ये विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, प्राध्यापक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!