news
Home अकोला काळाचा घाला! महापुराने एका कुटुंबाला केले उद्ध्वस्त…

काळाचा घाला! महापुराने एका कुटुंबाला केले उद्ध्वस्त…

शेतातून परतणाऱ्या मायलेकींना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज आला नाही; आई बेपत्ता, तर मुलगी बचावली. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

नदीच्या महापुरात मजूर महिला बेपत्ता, मुलगी बचावली

 

 

कंझरा येथील ढगफुटीसदृश्य पावसामुळे दुर्घटना; प्रशासनाकडून शोधकार्य सुरूच

२९ ऑगस्ट २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

कंझरा,प्रतिनिधी : विलास सावळे – कंझरा परिसरात आज झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, कमळ गंगा नदीला आलेल्या महापुरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. शेतातील काम आटोपून घरी परतणाऱ्या रेखा रमेश मते या मजूर महिलेचा शोध सुरू आहे, तर त्यांची मुलगी साक्षी रमेश मते ही काटेरी झुडपांना अडकल्याने सुदैवाने वाचली आहे.


पाण्याचा अंदाज न आल्याने दुर्घटना

 

ही हृदयद्रावक घटना कझरा ते आरखेड शिवारात घडली. रेखा आणि त्यांची मुलगी साक्षी शेतातील काम संपवून घराकडे परतत होत्या. रस्त्यात कमळ गंगा नदीला पूर आला असल्याचा त्यांना अंदाज आला नाही. नदी पार करत असताना पाण्याचा प्रचंड प्रवाह आल्याने दोघीही मायलेकी वाहून गेल्या. साक्षीने नदीकाठच्या एका काटेरी झुडपाला पकडून स्वतःला वाचवले, मात्र तिच्या आईचा हात सुटला आणि त्या पाण्यात बेपत्ता झाल्या.


प्रशासनाकडून युद्धपातळीवर शोधकार्य

 

घटनेची माहिती मिळताच आमदार हरीश भाऊ पिंपळे, ठाणेदार श्रीधर गुट्टे, तहसीलदार शिल्पा बोबडे, पोलीस पाटील जितेंद्र लांडे, ग्रामसेवक, तलाठी आणि गावातील बहुसंख्य नागरिक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. प्रशासनाकडून बेपत्ता झालेल्या महिलेचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.


© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!