news
पिंपरीतील ‘श्रीटिकेल’ कंपनीच्या २७५ कामगारांनी केले रक्तदान; ‘वायसीएम’ मधील गरीब रुग्णांना मिळणार जीवनदान!पिंपरी-चिंचवडमधील १३४ मनपा शाळांमध्ये सुट्टीच्या दिवशी घुमला ‘ओंकार’ नाद! आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभागपिंपरी-चिंचवड मनपा आणि योग विद्या धामच्या संयुक्त विद्यमाने ‘एक पृथ्वी, एक आरोग्य’ संकल्पनेवर भव्य योग सोहळा!रहाटणीत आंतरराष्ट्रीय योगदिनाचा उत्साह! आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी महाराज उद्यानात सामूहिक योगसाधनापिंपरी मनपा मुख्यालयाबाहेर ‘मॅक्स मंथन’च्या बातमीचा महाप्रभाव! ‘डेथ ट्रॅप’ ठरलेले ड्रेनेज चेंबर सुट्टीच्या दिवशी युद्धपातळीवर दुरुस्त
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवडच्या विकासातील ‘योगदान’ सेवानिवृत्त! महापालिकेने केला ३२ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान

पिंपरी-चिंचवडच्या विकासातील ‘योगदान’ सेवानिवृत्त! महापालिकेने केला ३२ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान

अनेकांनी दिली अनेक वर्षे सचोटीची सेवा; उप आयुक्तांनी व्यक्त केली कृतज्ञता. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

३२ अधिकारी-कर्मचारी महापालिका सेवेतून सेवानिवृत्त

 

 

मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, कार्यकारी अभियंता विजय वाईकर यांचा समावेश

 

२९ ऑगस्ट २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी, प्रतिनिधी शाम सोनवणे – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सेवेत अनेक वर्षे काम करून सेवानिवृत्त होणाऱ्या ३२ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. महापालिकेने वेगाने प्रगती केली असून, यात या सर्व कर्मचाऱ्यांचे सातत्य, सचोटी आणि जबाबदारीने केलेल्या सेवेचे मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन उप आयुक्त संदीप खोत यांनी केले.


सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान

 

चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे झालेल्या कार्यक्रमात ऑगस्ट २०२५ अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणारे २३ आणि स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या ९ अशा एकूण ३२ कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, कार्यकारी अभियंता विजय वाईकर, उप अभियंता मोहन खोंद्रे यांच्यासह विविध विभागांतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

माहे जुलै २०२५ मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या कर्मचाऱ्यांमध्ये मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, कार्यकारी अभियंता विजय वाईकर, उप अभियंता मोहन खोंद्रे कार्यालय अधीक्षक साधना ढमाले, पांडुरंग मोरे , गट निर्देशक मनोज ढेरंगे, सिस्टर इनचार्ज शारदा भोर, संगीता कदम, लघुलेखक प्रशांत काळेगोरे, भांडारपाल अनय म्हसे, क्रीडा शिक्षक विजय लोंढे, ए. एन.एम. वंदना गोपकर, सुरक्षा सुपरवायझर शंकर आरोळकर, लिपिक शंकर कानडी, वायरमन संजय पांढरकर, रखवालदार मधुकर भारती, शिपाई सुनिता फाले, मुकुंद गुरव, मजूर गणपती नाईक, आया रोहिणी सोन्नयल्लू, विशाखा जाधव, गटर कुली चंद्रकांत जगताप, सफाई कामगार आशा जगताप यांचा समावेश होता.

तर स्वेछानिवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्य निरीक्षक संजय गेंगजे, सफाई कामगार गेनबहादूर खत्री, मैनाबाई सोनवणे, सोजर शिंदे, सफाई सेवक शेषराव वाकोडे, अन्वर गागडे, कचरा कुली संजू घोलप, मुकादम अनिल तापकीर, सफाई कामगार पोपट चव्हाण यांचा समावेश आहे.

या कार्यक्रमात उप आयुक्त संदीप खोत यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुढील आनंदी आणि निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, संगणक अधिकारी वैभवी गोडसे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आणि महापालिका कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.


© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!