news
“येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिली गुन्ह्यांची कबुली!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; महाळुंगे आणि तळेगाव एम.आय.डी.सी. परिसरातील चोरीचे धागेदोरे उघड“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ
Home पिंपरी चिंचवड चिंचवडकरांना दिलासा! जुना ‘धोकादायक’ पूल आता ‘नवीन’ सुरक्षित मार्गात बदलेल

चिंचवडकरांना दिलासा! जुना ‘धोकादायक’ पूल आता ‘नवीन’ सुरक्षित मार्गात बदलेल

४९ वर्षे जुन्या उड्डाणपुलाला स्ट्रक्चरल ऑडिटनंतर मंजुरी; प्रवाशांची सुरक्षा आणि वाहतूक कोंडी कमी करण्याचे उद्दिष्ट. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

चिंचवड स्टेशनजवळ नवीन रेल्वे उड्डाणपूल उभारणीला मंजुरी

 

 

४९ वर्षे जुना पूल पाडून नवीन पूल बांधण्याचा निर्णय; प्रवाशांसाठी प्रवास होणार अधिक सुरक्षित

 

२९ ऑगस्ट २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी, प्रतिनिधी शाम सोनवणे – पिंपरी-चिंचवड महापालिकेने चिंचवड रेल्वे स्थानकाजवळील १९७६ मध्ये बांधलेला जुना रेल्वे उड्डाणपूल (आरओबी) पाडून त्याऐवजी नवीन पूल बांधण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हा निर्णय तज्ज्ञांच्या स्ट्रक्चरल ऑडिट अहवालांवर आणि रेल्वे विभागाच्या मंजुरीनंतर घेण्यात आला असून, यामुळे वाहनचालकांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सोयीचा होणार आहे.


 

जुन्या पुलाचे बांधकाम १९७६ मध्ये

 

मुंबई-पुणे महामार्गावरील महावीर चौकातून चिंचवड गावाकडे जाणाऱ्या या पुलाचे बांधकाम १९७६ मध्ये झाले होते, तर त्याच्या बाजूला समांतर पूल २००४ मध्ये बांधण्यात आला. स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये १९७६ चा जुना पूल कमकुवत असल्याचे आढळल्याने, त्यावर जड वाहनांची वाहतूक थांबवण्यात आली होती.

महापालिकेने केलेल्या तांत्रिक पाहणीत आणि २०२१ व २०२२ मध्ये झालेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये हा पूल पाडण्याची शिफारस करण्यात आली होती. अखेर, डिसेंबर २०२४ मध्ये रेल्वे विभागाने जुना पूल पाडून नवीन पूल बांधण्यासाठी संमती दिली.


 

नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य

 

या प्रकल्पासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली असून, लवकरच कामाला सुरुवात होईल. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले की, “नागरिकांच्या सुरक्षेला नेहमीच प्राधान्य दिले जाते. ५० वर्षे जुना हा पूल धोकादायक असल्याने नागरिकांच्या अभिप्रायानुसार आणि तज्ज्ञांच्या मूल्यांकनानंतर नवीन पूल उभारण्यात येणार आहे.”

हा नवीन उड्डाणपूल बांधला गेल्यानंतर केवळ प्रवास अधिक सुरक्षितच होणार नाही, तर वेळेचीही बचत होणार आहे, असे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी सांगितले. यामुळे परिसरातील वाहतूक कोंडी कमी होईल आणि दैनंदिन प्रवाशांना अधिक सुलभ प्रवासाचा अनुभव मिळेल.

चिंचवड रेल्वे स्टेशनजवळ असणाऱ्या पुलावरून जड वाहतूक व बसेस स्ट्रक्चरल ऑडिटच्या अहवालानंतर बंद करण्यात आल्या आहेत. आता रेल्वे विभागाच्या मंजुरीनंतर येथे नवीन पूल उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे.असे शहर अभियंता प्रमोद ओंभासे यांनी सांगितले.


© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!