news
Home पुणे छायाचित्रे ‘बोलतात’ देशाचा इतिहास! बालगंधर्वमध्ये ‘३०० फोटों’चे प्रदर्शन सुरू

छायाचित्रे ‘बोलतात’ देशाचा इतिहास! बालगंधर्वमध्ये ‘३०० फोटों’चे प्रदर्शन सुरू

पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि पुणे फेस्टिव्हलचा संयुक्त उपक्रम; "छायाचित्रकार नसते तर इतिहास कळला नसता" - खासदार प्रणिती शिंदे. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

छायाचित्रकारांच्या कलाकृतींचे प्रदर्शन पुणेकरांसाठी खुले

 

 

पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि पुणे फेस्टिव्हलचा अभिनंदनीय उपक्रम

 

२९ ऑगस्ट २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पुणे – पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि पुणे फेस्टिव्हल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन बालगंधर्व कलादालन येथे झाले. या प्रदर्शनात पुणे शहरातील ४५ वृत्तपत्र छायाचित्रकारांनी टिपलेली सुमारे तीनशे छायाचित्रे पुणेकरांसाठी मांडण्यात आली आहेत.


छायाचित्रे जपतात देशाचा इतिहास

या प्रदर्शनाचे उद्घाटन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, “छायाचित्रकार नसते तर देशाचा इतिहास कधीच कळला नसता. छायाचित्रांमुळेच आपला इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचतो. तो जपण्याची आणि टिपण्याची मोठी जबाबदारी छायाचित्रकारांवर आहे.”

उल्हासदादा पवार यांनी पुणे फेस्टिव्हलचे संस्थापक सुरेश कलमाडी यांचे स्मरण केले आणि जगभरात पोहोचलेल्या या फेस्टिव्हलने छायाचित्रांचे प्रदर्शन भरवल्याबद्दल कौतुक केले. या प्रदर्शनाचे उद्घाटन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते झाले. खासदार प्रणिती शिंदे, पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य संयोजक ॲड. अभय छाजेड, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीस मंगेश फल्ले, सचिन आडेकर, आबा जगताप आदी यावेळी उपस्थित होते.


पोलीस आयुक्तांचीही उपस्थिती

 

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीही या प्रदर्शनाला भेट देऊन छायाचित्रकारांचे कौतुक केले. हे प्रदर्शन ३० ऑगस्टपर्यंत सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.


© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!