पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी कठोर अंमलबजावणीचे निर्देश
मूर्ती संकलन, निर्माल्य व्यवस्थापनासह उपाययोजनांची अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी घेतली आढावा
३० ऑगस्ट २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेने यंदाही पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी मूर्ती संकलन आणि निर्माल्य व्यवस्थापनासह इतर उपाययोजनांची अंमलबजावणी शिस्तबद्ध पद्धतीने करण्याचे निर्देश दिले आहेत.
‘पुनरावर्तन’ उपक्रमातून पर्यावरण संरक्षण
गणेशोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीत, अतिरिक्त आयुक्त खोराटे यांनी शाडू मातीच्या आणि पीओपी (POP) मूर्तींच्या विसर्जनासाठी स्वतंत्र कृत्रिम हौदांची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. पीओपी मूर्तींच्या विसर्जनासाठी आवश्यक अमोनियम बायकार्बोनेट उपलब्ध असून, त्याचा प्रभावी वापर करण्यावरही त्यांनी भर दिला.
मागील वर्षीप्रमाणे यंदाही महापालिका ‘पुनरावर्तन’ हा उपक्रम राबवत आहे. याअंतर्गत शहरातील २६ ठिकाणी शाडू मातीच्या मूर्ती संकलित करण्यासाठी केंद्रे उभारण्यात आली आहेत. नागरिकांनी या उपक्रमाला प्रतिसाद देऊन पर्यावरणाचे रक्षण करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
शाडू माती मूर्ती संकलन केंद्रांची यादी:
‘अ’ क्षेत्रीय कार्यालय:
- कापसे उद्यान, मोरवाडी, पिंपरी
- गणेश तलाव, प्राधिकरण
‘ब’ क्षेत्रीय कार्यालय:
- के टाऊन बिल्डिंग शेजारी, किवळे
- सागर केमिस्ट जवळ, रावेत
- गावडे जलतरण तलाव समोर, चिंचवड
- मोरया क्रीडांगण समोर
‘क’ क्षेत्रीय कार्यालय:
- मोशी घर, मोशी
- चिखली घाट, चिखली
- अंकुशराव लांडगे सभागृह, भोसरी
- जलवायु विहार, सेक्टर ६, भोसरी/मोशी
- बाल भवन उर्दू शाळा, खराळवाडी, पिंपरी
- नेहरू पुतळा, नेहरूनगर, पिंपरी
- स्केटिंग ग्राऊंड, मासुळकर कॉलनी, पिंपरी
- एच ए ग्राऊंड, नेहरूनगर, पिंपरी
‘ड’ क्षेत्रीय कार्यालय:
- बफर झोन, पुनावळे
- चोंडे घाट, पिंपळे निलख
‘ई’ क्षेत्रीय कार्यालय:
- डोलास मैदान, दिघी
- चऱ्होली इंद्रायणी घाट, चऱ्होली
‘फ’ क्षेत्रीय कार्यालय:
- घरकुल टाउनशिप, चिखली
- आयटी पार्क, निघोजे ब्रिज, तळवडे
- सेक्टर क्र. २२, एचसीएमटीआर, निगडी
‘ग’ क्षेत्रीय कार्यालय:
- थेरगाव हॉस्पिटल पार्किंग प्लॉट, थेरगाव
- केजुदेवी घाट, बोट क्लब, थेरगाव
‘ह’ क्षेत्रीय कार्यालय:
- वेताळ महाराज घाट, जुने सांगवी
- दत्त मंदिर आश्रम, जुने सांगवी
- दत्त मंदिर घाट, जुने सांगवी
© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
