news
पूरणनगरमध्ये वाळलेल्या झाडांमुळे मृत्यूची टांगती तलवार; वारंवार तक्रार करूनही मनपा उद्यान विभागाचे ‘डोळेझाक’!पिंपळे सौदागरच्या लिनिअर गार्डनमध्ये रंगला भक्ती आणि योगाचा अनोखा संगम! ‘द आर्ट ऑफ लिविंग’ आणि भाजपचा संयुक्त उपक्रमरहाटणीत नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची धडक कारवाई! गजानन नगरमधील ‘डेथ ट्रॅप’ ठरणारी ड्रेनेज समस्या २४ तासांत केली गुलपिंपरी-चिंचवडमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ५ कोटींची फसवणूक करणारे आहेरकर कुटुंब नेवासामधून अटक! आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाईजागतिक बाजारात सोने गडगडले! स्पॉट गोल्ड ४,१६९ डॉलरवर; अमेरिकन व्याजदर आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार चिंतेत
Home मुंबई मराठा आंदोलनाची धार वाढणार! ‘पँथर सेने’ची एंट्री, सरकारवर थेट आरोप

मराठा आंदोलनाची धार वाढणार! ‘पँथर सेने’ची एंट्री, सरकारवर थेट आरोप

आंदोलकांना पाणीसुद्धा दिले जात नाहीये, तात्काळ सुविधा पुरवा; संघटनेचे मुख्यमंत्र्यांना आवाहन. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

मराठा आरक्षणाला ‘ऑल इंडिया पँथर सेने’चा पाठिंबा

 

 

 

गरीब मराठ्यांना सामाजिक न्याय मिळालाच पाहिजे; आंदोलकांना तात्काळ सुविधा देण्याची मागणी

 

३० ऑगस्ट २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

मुंबई – मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आता ‘ऑल इंडिया पँथर सेने’नेही पाठिंबा जाहीर केला आहे. सामाजिक परिवर्तनासाठी हा पाठिंबा देण्यात आल्याचे सांगत, गरीब मराठ्यांना सामाजिक न्याय मिळालाच पाहिजे, अशी भूमिका ‘ऑल इंडिया पँथर सेने’ने घेतली आहे.

आंदोलकांची दखल घेण्याचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

‘ऑल इंडिया पँथर सेने’ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आंदोलनाकडे तात्काळ लक्ष देण्याचे आवाहन केले आहे. आंदोलकांना कोणत्याही सुविधा न देता त्यांचा कोंडमारा केला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. अनेक आंदोलकांनी पाणीसुद्धा दिले जात नसल्याचे सांगितले असून, प्रशासनाने पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

राज्य सरकारने या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देऊन मराठा आंदोलकांना आवश्यक सुविधा पुरवाव्यात, अशी जोरदार मागणी ‘ऑल इंडिया पँथर सेने’चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आयु.विनोद भोळे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आयु बाळासाहेब शेडगे, महाराष्ट्र सरचिटणीस आयु जितेश जगताप सदर आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. या पाठिंब्यामुळे मराठा आंदोलनाची धार अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!