news
Home पिंपरी चिंचवड भाजपला मिळाला नवा ‘युवा’ चेहरा; कुणाल लांडगे आता शहर प्रवक्ते

भाजपला मिळाला नवा ‘युवा’ चेहरा; कुणाल लांडगे आता शहर प्रवक्ते

पक्षाची ध्येय धोरणे प्रभावीपणे मांडणार, आगामी मनपा निवडणूक मोठ्या फरकाने जिंकणार असल्याचा विश्वास. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

 

कुणाल लांडगे यांची भाजपच्या शहर प्रवक्तेपदी निवड

 

 

संघटन कौशल्य आणि युवा चेहरा यामुळे मिळाली संधी

 

२९ ऑगस्ट २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी – भारतीय जनता पार्टीच्या पिंपरी-चिंचवड शहर प्रवक्तेपदी कुणाल दशरथ लांडगे यांची निवड करण्यात आली आहे. भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी ही घोषणा केली. कुणाल लांडगे यांच्याकडे असलेले संघटन कौशल्य, त्यांचा युवा आणि आक्रमक चेहरा तसेच पक्षाप्रती असलेली त्यांची निष्ठा यामुळे ही निवड करण्यात आल्याचे काटे यांनी सांगितले.


 

प्रभावीपणे पक्षाची ध्येय धोरणे मांडणार

 

या निवडीनंतर बोलताना कुणाल लांडगे यांनी पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचे आणि आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, अमित गोरखे, उमा खापरे आणि शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांचे आभार मानले. प्रवक्ता म्हणून माध्यमांसमोर आणि सोशल मीडियावर पक्षाची ध्येय धोरणे तसेच विकासकामे अधिक प्रभावीपणे मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आगामी काळात होणाऱ्या मनपा निवडणुका भाजप मोठ्या फरकाने जिंकेल आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेवर पुन्हा एकदा भाजपचा झेंडा फडकणार असल्याचा विश्वासही कुणाल लांडगे यांनी व्यक्त केला.


© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!