news
पिंपरीतील ‘श्रीटिकेल’ कंपनीच्या २७५ कामगारांनी केले रक्तदान; ‘वायसीएम’ मधील गरीब रुग्णांना मिळणार जीवनदान!पिंपरी-चिंचवडमधील १३४ मनपा शाळांमध्ये सुट्टीच्या दिवशी घुमला ‘ओंकार’ नाद! आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभागपिंपरी-चिंचवड मनपा आणि योग विद्या धामच्या संयुक्त विद्यमाने ‘एक पृथ्वी, एक आरोग्य’ संकल्पनेवर भव्य योग सोहळा!रहाटणीत आंतरराष्ट्रीय योगदिनाचा उत्साह! आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी महाराज उद्यानात सामूहिक योगसाधनापिंपरी मनपा मुख्यालयाबाहेर ‘मॅक्स मंथन’च्या बातमीचा महाप्रभाव! ‘डेथ ट्रॅप’ ठरलेले ड्रेनेज चेंबर सुट्टीच्या दिवशी युद्धपातळीवर दुरुस्त
Home अकोला दारूच्या तळीरामांना कोणाचा आशीर्वाद? गावात खुलेआम विक्रीमुळे नागरिकांत संताप

दारूच्या तळीरामांना कोणाचा आशीर्वाद? गावात खुलेआम विक्रीमुळे नागरिकांत संताप

उत्पादन शुल्क विभागावर 'साटालोट्याचा' गंभीर आरोप; पोलिसांच्या धाडसी कारवाईमुळे नागरिकांना दिलासा. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

अवैध दारू विक्री विरोधात नागरिकांचा संताप

 

 

राज्य उत्पादन शुल्क विभागावर निष्क्रियतेचा आरोप; पोलिसांच्या कारवाईमुळे दिलासा

३० ऑगस्ट २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

मूर्तीजापूर (अकोला), प्रतिनिधी : विलास सावळे – मूर्तीजापूर तालुक्यातील खराब ढोरे गावामध्ये सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीमुळे नागरिक आणि विशेषतः महिलांमध्ये तीव्र नाराजी आहे. या समस्येमुळे गावातील युवक व्यसनाधीन होत असून, कुटुंबात अशांतता वाढत आहे. या परिस्थितीला आळा घालण्यात राज्य उत्पादन शुल्क विभाग अपयशी ठरल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.


साटालोट्याचा संशय आणि गंभीर आरोप

 

गावकऱ्यांच्या मते, अवैध दारूची विक्री बिनधास्तपणे सुरू असून उत्पादन शुल्क विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने, काही अधिकारी आणि दारू विक्रेत्यांमध्ये साटालोटा असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे. अनिल मधुकर थोप, रवींद्र प्रभाकर थोप आणि मिलिंद जानराव आटोटे यांच्यावर अवैध दारू विक्रीचा आरोप करत त्यांच्यावर तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी गावातील नागरिकांनी मूर्तीजापूर येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. प्रशासनाने यावर तातडीने कठोर पावले उचलावीत, अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.


पोलिसांची सकारात्मक भूमिका

 

या प्रकरणात मूर्तीजापूर ग्रामीणचे ठाणेदार श्रीधर गुट्टे यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यांनी खराब ढोरे गावातील अवैध दारू विक्रीवर मोठी कारवाई केली असून, अशा कारवाया पुढेही सुरू ठेवणार असल्याचे सांगितले आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.


© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!