news
Home अकोला डीजेचा ‘कहर’ बंद करा! अकोल्यात नागरिकांची ‘डीजेमुक्त’ मोहीम सुरू

डीजेचा ‘कहर’ बंद करा! अकोल्यात नागरिकांची ‘डीजेमुक्त’ मोहीम सुरू

कर्णकर्कश आवाजामुळे आरोग्य धोक्यात; प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेवर नागरिकांचा संताप. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

डीजेच्या कर्कश आवाजाने अकोलेकर त्रस्त, प्रशासन निष्क्रिय असल्याचा आरोप

 

 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांची उघडपणे पायमल्ली; नागरिकांचा संतप्त सवाल

 

३० ऑगस्ट २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

अकोला, प्रतिनिधी : विलास सावळे – अकोला जिल्ह्यात धार्मिक उत्सव, मिरवणुका, विवाह समारंभ किंवा कावड यात्रा अशा कोणत्याही कार्यक्रमात डीजेच्या कानठळ्या बसवणाऱ्या आवाजाने नागरिक हैराण झाले आहेत. रात्रभर सुरू असलेल्या कर्णकर्कश आवाजामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांची उघडपणे पायमल्ली होत असून, या गंभीर समस्येकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.


आरोग्यावर गंभीर परिणाम

 

डीजेच्या या अनियंत्रित आवाजामुळे गर्भवती महिला, लहान बाळे, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. हृदयविकार, उच्च रक्तदाब, मानसिक ताण आणि लहान मुलांच्या श्रवणशक्तीला धोका असे अनेक आजार वाढले आहेत. ८० डेसिबलपेक्षा जास्त आवाज धोकादायक असतो, तरीही डीजेचा आवाज १४० डेसिबलपर्यंत पोहोचत आहे.

या गंभीर परिस्थितीतही जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग आणि नगरपरिषद निष्क्रिय असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. डीजे लॉबीचा दबाव किंवा निवडणूक निधीचे राजकारण यामुळे प्रशासन कारवाई करत नाही का, असा संतप्त सवालही नागरिक विचारत आहेत.


 

‘डीजेमुक्त अकोला’ मोहीम सुरू करण्याचा निर्णय

 

या समस्येवर तोडगा काढण्यासाठी जिल्ह्यातील नागरिक संघटना, पालक संघ, डॉक्टर संघटना आणि सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन “डीजेमुक्त अकोला” मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांची कठोर अंमलबजावणी करून डीजेवर संपूर्ण बंदी आणत नाहीत, तोपर्यंत तीव्र जनआंदोलन उभारले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.


© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!