news
Home पिंपरी चिंचवड ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’चा अनोखा अनुभव! पिंपरी चिंचवडमध्ये सांस्कृतिक महासंगम

‘एक भारत, श्रेष्ठ भारत’चा अनोखा अनुभव! पिंपरी चिंचवडमध्ये सांस्कृतिक महासंगम

देशातील २८ राज्यांच्या माती-पाण्याने वृक्षारोपण; परदेशी प्रतिनिधींच्या उपस्थितीत राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज.)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रीय सांस्कृतिक महासंगम; १५ ते १७ सप्टेंबर दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन

 

पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, ०३ सप्टेंबर २०२५:

भारताच्या विविधतेतील एकता आणि सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडवण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर सज्ज झाले आहे. महाराष्ट्र युवा संघटन आणि रोटरी क्लब ऑफ पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने दुसरा राष्ट्रीय सांस्कृतिक युवा आदान-प्रदान महोत्सव १५ ते १७ सप्टेंबर २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये देशातील २८ राज्यांसह ३ परदेशांतील युवा प्रतिनिधी सहभागी होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत समीर भंडारकर यांनी दिली आहे.


 

सद्भावना रॅली आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक

 

हा तीन दिवसीय महोत्सव आकुर्डी येथील ग. दी. माडगुळकर सभागृह येथे होणार आहे. महोत्सवाची सुरुवात १५ सप्टेंबर रोजी आकुर्डी परिसरात भव्य सद्भावना रॅलीने होणार आहे. यात सहभागी युवक-युवती आपापल्या राज्याच्या पारंपरिक वेशभूषेत सहभागी होतील. त्यानंतर, २८ राज्यांमधून आणलेल्या माती आणि पाण्याचा उपयोग करून ‘राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक’ म्हणून वृक्षारोपण केले जाईल.

तीनही दिवस सायंकाळी ५ ते ८ या वेळेत विविध राज्यांचे आणि देशांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातील. १६ सप्टेंबर रोजी युवक-युवतींना पिंपरी चिंचवड परिसरातील प्रेक्षणीय आणि ऐतिहासिक स्थळांची सफर घडवली जाईल. १७ सप्टेंबर रोजी तासगावकर फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, त्यानंतर निरोप समारंभाने महोत्सवाची सांगता होईल, अशी माहिती संतोष गिरंजे यांनी दिली.


मान्यवरांची प्रमुख उपस्थिती

 

या महासंगमाचे उद्घाटन पिंपरी चिंचवडचे आयुक्त शेखर सिंग आणि उपआयुक्त पंकज पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे. तसेच, या तीन दिवसीय कार्यक्रमासाठी पुढील मान्यवर उपस्थित राहणार आहेत:

भाऊसाहेब भोईर (नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष), माजी महापौर शैलजा अविनाश मोरे, प्रदेशाध्यक्ष भाजपा युवा मोर्चाचे अनुपदादा अविनाश मोरे, युवा उद्योजक पुनीतजी बालन, जान्हवीताई बालन (धारीवाल), संतोष मराठे (जिल्हा प्रांतपाल), रो. आनंद संपत (अध्यक्ष), रोहन रोकडे (सचिव), समीर भंडारकर, संतोष गिरंजे, पवन गुप्ता (भावी प्रांतपाल), नितीन ढमाले, रो. वंश चावला, शुभम राऊत, स्वस्ती राय, मा. सुजाता सातव मॅडम, दत्ता दळवी, मल्लिकार्जुन बंकाकुळे, विजय संतान, युवराज नाईक, महादेव कांचन, एस.एस. तिवारी, डॉ. प्रा. अन्वर शेख, डॉ. प्रा. सुधाकर जाधव, सागर घोरपडे (पोलीस), अविनाश सकुंडे (लंडन बुक ऑफ संचालक), लहु कांबळे (संस्थापक अध्यक्ष), पल्लवी गोपाळे (सरपंच), संग्रामदादा कोंडे, संजय जगताप, अविनाश शेटे (माय भारत संचालक, भारत सरकार).

या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ पिंपरी यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. समन्वयक म्हणून मोतीलाल बेंद्रे (विस्तार अधिकारी, जिल्हा परिषद पुणे), हनुमंत देसाई, संतोषी शेट्टी, दिनेश भंडारे, साहिल गायकवाड, कुणाल इटकर, प्रेम चाबुकस्वार, अभिजित रोकडे इत्यादी युवक या कार्यक्रमासाठी परिश्रम घेत आहेत.


© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!