news
Home पिंपरी चिंचवड शिक्षकांचा गौरव, शहराचे भविष्य उज्वल!

शिक्षकांचा गौरव, शहराचे भविष्य उज्वल!

पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून २३ 'आदर्श शिक्षकां'ना सन्मान; 'भविष्याचे शिल्पकार' म्हणून आयुक्तांनी केले कौतुक. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज.)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आदर्श शिक्षकांचा गौरव

 


 

२३ शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान; शहराचे भवितव्य घडवणाऱ्या शिल्पकारांचा सत्कार

 

पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे , ०४ सप्टेंबर २०२५:

शिक्षक दिनाचे औचित्य साधून, पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या २३ शिक्षकांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन सन्मानित केले. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित या भव्य कार्यक्रमात आमदार अमित गोरखे, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील आणि तृप्ती सांडभोर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


शिक्षकांबद्दल गौरवाचे उद्गार

 

या सोहळ्यात बोलताना आमदार अमित गोरखे म्हणाले, “शिक्षक हा समाजातील एक महत्त्वाचा घटक आहे आणि महापालिकेचा शिक्षण विभाग अतिशय उत्तम कार्य करत आहे. मी स्वतः महापालिकेच्या शाळेचा विद्यार्थी असून, माझ्या जडणघडणीत माझ्या शिक्षकांचा मोठा वाटा आहे.” अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनीही शिक्षकांच्या योगदानाला सलाम करत, “शाळा म्हणजे मुलांच्या भविष्याचा भक्कम पाया आहे, आणि तो मजबूत करण्याचे कार्य आपले शिक्षक निष्ठा, समर्पण आणि प्रेमाने करीत आहेत,” असे सांगितले.

या कार्यक्रमात महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांचा व्हिडिओ संदेशही दाखवण्यात आला. यात त्यांनी शिक्षकांना ‘मुलांच्या स्वप्नांना आकार देणारे खरे शिल्पकार’ असे संबोधले. ते म्हणाले, “प्रत्येक मुलाच्या यशामागे त्याच्या शिक्षकाची मेहनत आणि ममत्व दडलेले असते. आपल्या महापालिका शाळा पालकांना अभिमानाने निवडाव्याशा वाटतील, या दिशेने शिक्षकांचे योगदान सर्वाधिक आहे.”


आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आलेले शिक्षक

 

या कार्यक्रमात बालवाडी, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव करण्यात आला.

विशेष पुरस्कार प्राप्त शिक्षक:

  • क्रीडा शिक्षक भाऊसाहेब व्यंकट खैरे
  • पीसीएमसी पब्लिक स्कूल जाधववाडी कन्या प्राथमिकचे जितेंद्र कराड
  • आबासाहेब पाळवंदे

बालवाडी विभागातील आदर्श शिक्षक:

  • यशवंतराव चव्हाण प्राथमिक शाळा, थेरगाव – सविता मांडेकर
  • यशवंतराव चव्हाण उर्दू शाळा, थेरगाव – नसरीन बानो मोहम्मद सुलतान
  • सावित्रीबाई फुले शाळा, मोशी – वैशाली साकोरे

प्राथमिक शाळांमधील आदर्श शिक्षक:

  • पीसीएमसी पब्लिक स्कूल, मोशी मुले – प्रियंका गावडे
  • सुभांगी भोंडवे
  • दिघी कन्या पब्लिक स्कूल – प्रदीप घुटे
  • भोसरी कन्या पब्लिक स्कूल – स्वाती शिंदे
  • मोशी कन्या पब्लिक स्कूल – कांचन घोडे
  • चिखली कन्या पब्लिक स्कूल – विश्वलता मोरे
  • कुदळवाडी पब्लिक स्कूल – मारुती खामकर
  • पिंपळे गुरव पब्लिक स्कूल – चित्रा शेवकरी
  • थेरगाव उर्दू पब्लिक स्कूल – उस्ताद बिबिहाज्रा जंगबहादूर

माध्यमिक शाळांमधील आदर्श शिक्षक:

  • पिंपळे गुरव येथील पीसीएमसी पब्लिक स्कूल – प्रिया नांगरे
  • पिंपळे सौदागर येथील पीसीएमसी पब्लिक स्कूल – वैशाली मामुल्वार
  • राजश्री कांबळे
  • क्षितिज शिंदे

खासगी शाळांमधील आदर्श शिक्षक:

  • विलू पूनावाला प्राथमिक शाळा, निगडी – मनिषा कदम
  • श्री फत्तेचंद जैन विद्यालय व ज्युनियर कॉलेज, चिंचवड – अंजू सोनावणे
  • जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ स्कूल व ज्युनियर कॉलेज – सखाराम पितळे
  • आकांक्षा संचालित कै. दत्तोबा रामचंद्र काळे इंग्रजी माध्यम शाळा, काळेवाडी – मेघा कानडे

या कार्यक्रमाला महापालिकेचे सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, प्रशासन अधिकारी संगीता बांगर, सहाय्यक प्रशासन अधिकारी रजिया खान आणि इतर अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगीता बांगर यांनी केले, सूत्रसंचालन चारोशीला फुगे यांनी केले, तर आभार गणेश लिंगडे यांनी मानले.


© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!