news
Home पिंपरी चिंचवड पिंपळे सौदागरकरांचे स्वप्न साकार: खड्डेमुक्त रस्त्याकडे वाटचाल सुरू

पिंपळे सौदागरकरांचे स्वप्न साकार: खड्डेमुक्त रस्त्याकडे वाटचाल सुरू

नागरिकांच्या जीवनाशी निगडित प्रश्न सोडवणे हीच खरी जनसेवा: श्री. शत्रुघ्न काटे. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

 

पिंपळे सौदागरच्या रहिवाशांना दिलासा: खड्डेमुक्त रस्त्यासाठी शत्रुघ्न काटे यांचे प्रयत्न यशस्वी

 


 

ट्रायोज-झुलेलाल सोसायटी रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू; नागरिकांनी व्यक्त केला आनंद

 

पिंपळे सौदागर,पिंपरी, प्रतिनिधी शाम सोनवणे ०८ सप्टेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपळे सौदागर परिसरातील ट्रायोज-झुलेलाल टॉवर सोसायटी रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून खड्ड्यांमुळे विद्रूप झाला होता. यामुळे नागरिकांना दैनंदिन प्रवासात मोठा त्रास सहन करावा लागत होता. वाहन अपघात, वाहतुकीतील अडथळे आणि पावसाळ्यातील चिखलामुळे रहिवासी त्रस्त झाले होते. नागरिकांच्या या दीर्घकाळ प्रलंबित प्रश्नाची दखल घेत माजी नगरसेवक तथा पिंपरी-चिंचवड भाजप शहराध्यक्ष श्री शत्रुघ्न (बापु) काटे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर, त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे.


नागरिकांनी मानले आभार

 

या कामाच्या सुरुवातीच्या वेळी श्री शत्रुघ्न (बापु) काटे स्वतः उपस्थित होते. त्यांनी दोन्ही सोसायट्यांमधील रहिवासीयांशी संवाद साधून कामाची सविस्तर माहिती दिली. कामाची प्रत्यक्ष सुरुवात होताच परिसरातील नागरिकांनी मोठा आनंद व्यक्त केला. एका रहिवाशाने सांगितले, “आजवर आम्हाला खड्ड्यांमधून प्रवास करावा लागत होता, खूप हाल सोसावे लागले. बापूंच्या अथक प्रयत्नांमुळे शेवटी आमचा जुना प्रश्न सुटला. आता आम्हाला कायमस्वरूपी टिकणारा काँक्रीटचा रस्ता मिळणार आहे.”


नागरिकांच्या जीवनाशी निगडित प्रश्न सोडवणे हीच खरी जनसेवा

 

या प्रसंगी उद्योजक तथा आमदार शंकर जगताप यांचे बंधू श्री विजयशेठ जगताप म्हणाले की, “हा रस्ता नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची जीवनवाहिनी आहे. रोजच्या प्रवासाला, व्यवसायाला आणि परिसराच्या विकासाला याचा थेट उपयोग होणार आहे.”

श्री शत्रुघ्न (बापु) काटे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेले प्रश्न सोडवणे हीच खरी जनसेवा आहे. पिंपळे सौदागर परिसरातील रस्त्यांचा दर्जा वाढवण्यासाठी आणि नागरिकांना खड्डेमुक्त, दर्जेदार रस्त्यांची सुविधा देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. विशेषतः, या रस्त्यालगतच शाळा असल्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाचा मोठा फायदा होणार आहे.”

या काँक्रिटीकरणामुळे परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली असून, आता या भागात खड्डेमुक्त आणि कायमस्वरूपी रस्त्याचे स्वप्न साकार झाले आहे. यावेळी श्री विजयशेठ जगताप, श्री संजयशेठ भिसे, सौ. कुंदाताई भिसे, श्री धनंजयशेठ भिसे, श्री अनिलशेठ काटे यांच्यासह दोन्ही सोसायटींमधील पदाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.


© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!