news
रहाटणीत आंतरराष्ट्रीय योगदिनाचा उत्साह! आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी महाराज उद्यानात सामूहिक योगसाधनापिंपरी मनपा मुख्यालयाबाहेर ‘मॅक्स मंथन’च्या बातमीचा महाप्रभाव! ‘डेथ ट्रॅप’ ठरलेले ड्रेनेज चेंबर सुट्टीच्या दिवशी युद्धपातळीवर दुरुस्तपुर्णा नगरमध्ये वाळलेल्या झाडांमुळे मृत्यूची टांगती तलवार; वारंवार तक्रार करूनही मनपा उद्यान विभागाचे ‘डोळेझाक’!पिंपळे सौदागरच्या लिनिअर गार्डनमध्ये रंगला भक्ती आणि योगाचा अनोखा संगम! ‘द आर्ट ऑफ लिविंग’ आणि भाजपचा संयुक्त उपक्रमरहाटणीत नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची धडक कारवाई! गजानन नगरमधील ‘डेथ ट्रॅप’ ठरणारी ड्रेनेज समस्या २४ तासांत केली गुल
Home पिंपरी चिंचवड अमर हुतात्मा उमाजी नाईक: देशभक्तीच्या ज्योतीचे स्मरण

अमर हुतात्मा उमाजी नाईक: देशभक्तीच्या ज्योतीचे स्मरण

इंग्रजांविरुद्ध पहिल्या सशस्त्र लढ्याची हाक देणाऱ्या महान नायकास पिंपरी-चिंचवड शहराची मानवंदना. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

 

क्रांतीकारक उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेकडून आदरांजली

 


उपायुक्त अण्णा बोदडे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण; देशभक्तीची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या नायकाचे स्मरण

पिंपरी, प्रतिनिधी शाम सोनवणे, ०७ सप्टेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

थोर क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले. पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत उपायुक्त अण्णा बोदडे यांच्या हस्ते उमाजी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.


 

कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर

 

या अभिवादन कार्यक्रमात जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते सुभाष जाधव, शेखर गोरगले, प्रशांत माकर, केतन चव्हाण, अजय तटले, आशा तटले, कल्पना माकर, अनिता शितकले, शाहूराज चव्हाण, प्रतीक माकर तसेच महापालिकेच्या विविध विभागांतील कर्मचारी उपस्थित होते.


अण्णा बोदडे यांच्या भाषणातून कार्याचे स्मरण

 

यावेळी बोलताना उपायुक्त अण्णा बोदडे म्हणाले की, “राजे उमाजी नाईक हे इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा उभारणारे थोर क्रांतिकारक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या शौर्य, त्याग आणि देशभक्तीमुळे लोकांमध्ये स्वातंत्र्याची ज्योत अधिकच प्रज्वलित झाली.” राजे उमाजी नाईक यांच्या प्रखर देशभक्तीची प्रेरणा घेऊन अनेकांनी स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग घेतला, असेही त्यांनी नमूद केले.


© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!