मुख्यपृष्ठ
पत्नी वर्षा इंगळे यांनी स्वतःच्या यकृताचा भाग दान करत वाचवला पतीचा जीव; तब्बल २१ लाख ६० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य
मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्टच्या मदतीने अकोल्याच्या प्रशांत इंगळे यांना मिळाले नवजीवन; नानावटी रुग्णालयात यशस्वी यकृत प्रत्यारोपण!
अकोला/पिंपरी, प्रतिनिधी जयकुमार चर्जन दि. ६ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
“आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही गरजू रुग्णाचा उपचार पैशांअभावी थांबू नये, या उद्देशाने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष सातत्याने कार्यरत आहे. प्रशांत इंगळे यांना वेळेत मदत उपलब्ध करून देता आली, याचा आम्हाला आनंद आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी नागरिकांनी १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.”— रामेश्वर नाईक, प्रमुख, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष
सभापती बाबासाहेब त्रिभुवन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार; अत्यावश्यक सेवा अखंडित ठेवण्यासह खेळाडूंच्या शिष्यवृत्तीत वाढ
पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या सभेत विविध विकासकामांना मंजुरी; पशुवैद्यकीय, क्रीडा, शिक्षण आणि आपत्कालीन सेवांबाबत मोठे निर्णय!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान , दि. ६ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

“महापालिकेच्या सर्व अत्यावश्यक व नागरी सेवा कोणत्याही परिस्थितीत अखंडित राहाव्यात, शहरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम व्हाव्यात आणि क्रीडा, शिक्षण, आरोग्य तसेच लोकाभिमुख उपक्रमांना ताकद मिळावी, या उद्देशानेच आज विविध विषयांना मंजुरी देण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवडकरांना दर्जेदार आणि वेळेत सेवा उपलब्ध करून देणे हेच आमचे सर्वोच्च प्राधान्य असून शहराच्या विकासाला गती देणाऱ्या प्रत्येक कामाला स्थायी समितीच्या माध्यमातून प्राधान्य दिले जाईल.”— बाबासाहेब त्रिभुवन, सभापती, स्थायी समिती (पिंपरी-चिंचवड महापालिका)
तरुणांच्या तांत्रिक कौशल्याचा आणि नवोन्मेषी कल्पनांचा सन्मान; समाधान नरळे यांना २५ हजारांचे प्रथम पारितोषिक
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हॅकेथॉन २०२५ च्या विजेत्यांचा उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते गौरव!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ६ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
“हॅकेथॉनसारख्या स्पर्धा या तरुणांच्या कल्पकतेला आणि तांत्रिक कौशल्याला योग्य दिशा देणारे एक प्रभावी व्यासपीठ आहे. शहराच्या विविध नागरी समस्यांवर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आधुनिक उपाय शोधण्याची अथांग क्षमता आपल्या युवकांमध्ये आहे. अशा स्पर्धांमुळे नवोन्मेषी विचारांना चालना मिळते आणि भविष्यातील अधिक सक्षम, स्मार्ट व नागरिकाभिमुख शहर उभारण्यास निश्चितच मदत होते. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भविष्यातही अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांना सातत्याने पाठबळ देईल.”
वाढत्या राजकीय आणि सामाजिक ध्रुवीकरणाच्या काळात तत्त्वनिष्ठता, विवेक आणि संविधानिक मूल्यांवर भाष्य करणारा वैचारिक लेख
मतवादी क्या जाने, तत्ववादी की बात; सूरज डूबा, उल्लू कहे हुआ सवेरा!
अमरावती/पिंपरी, प्रतिनिधी जयकुमार चर्जन दि. ६ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
टीप: या लेखाचा उद्देश कोणत्याही व्यक्ती, पक्ष किंवा संघटनेवर टीका करणे नसून, समाजातील वाढत्या “मीच बरोबर” या मानसिकतेवर चिंतन करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. वैचारिक मतभेद हे विवेक आणि संवादाच्या चौकटीत राहिले तरच लोकशाही सुदृढ राहील.— प्रफुल्ल मंदा श्रीधर
मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर आनंदच; वडेट्टीवारांचा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर अन् आरएसएसवर घणाघाती हल्ला
‘नरेंद्र मोदींच्या जागी देवेंद्र फडणवीस पंतप्रधान झाले तर आनंदच!’; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचे राजकीय विधान!
नागपूर/पिंपरी, प्रतिनिधी दि. ५ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
नागपूर: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय भविष्याबाबत सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व आमदार विजय वडेट्टीवार यांनी एक महत्त्वपूर्ण आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारे विधान केले आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शाह यांच्या जागी जर एखादा मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होत असेल, तर आम्हा सर्व मराठी लोकांना त्याचा निश्चितच अभिमान आणि आनंद होईल,” असे वक्तव्य वडेट्टीवार यांनी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना केले.
रविवारच्या एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांचे काका बाळासाहेब फडणवीस यांनी ‘माझ्या पुतण्यात देशाचा पंतप्रधान होण्याची क्षमता आहे,’ असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना वडेट्टीवार यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही (RSS) जोरदार निशाणा साधला.
बाळासाहेब फडणवीस यांच्या विधानाचा संदर्भ देत विजय वडेट्टीवार म्हणाले:
“नातेवाईक, भाऊ किंवा काकांना आपल्या माणसाबाबत अशी भावना वाटणे स्वाभाविक आहे. सध्या गुजरातचे दोनच लोक देशात कोणाचे काय होणार हे ठरवत आहेत. अशा परिस्थितीत जर मोदींच्या जागी देवेंद्रजी देशाचे पंतप्रधान झाले, तर आम्हा मराठी माणसांना खूप आनंद होईल. आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचाही विकास व्हावा, हीच आमची इच्छा आहे.”
यावेळी त्यांनी भाजपच्या सध्याच्या कार्यपद्धतीवर आणि नेतृत्वावर टीका करताना विचारले की, “केवळ दोन उद्योगपती आणि सोशल मीडियाच्या भरवशावर उभारलेले नेतृत्व देशात उद्या कसली लोकशाही आणि नेतृत्व निर्माण करणार?”
जंतरमंतर येथे ‘सिटिझन्स फॉर जस्टिस अँड पीस’ (CJP) तर्फे आयोजित विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा उल्लेख करत वडेट्टीवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि सरकारवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘देशद्रोही’ किंवा ‘अँटी-नॅशनल’ ठरवून आरटीआयच्या (RTI) माध्यमातून त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. “लाखो तरुण जेव्हा शांततेने रस्त्यावर उतरतात, तेव्हा त्यांना तुम्ही देशद्रोही म्हणता. हे कसले देशभक्तीचे लक्षण आहे? देशातील तरुणांना जर असेच देशद्रोही ठरवत राहिलात, तर येत्या काळात सरकारला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील,” असा इशाराही विजय वडेट्टीवार यांनी दिला.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
रस्ते अपघात पीडितांच्या संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाचे कडक पाऊल; विमा नसलेल्या वाहनांना पेट्रोल पंपांवर इंधन नाकारण्याच्या योजनेचा विचार करण्याचे निर्देश
सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय: नवीन चारचाकी वाहनांसाठी थर्ड-पार्टी विमा ४ वर्षे, तर दुचाकींसाठी ६ वर्षे अनिवार्य!
पिंपरी, दि. ५ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: देशातील रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण आणि रस्त्यांवर धावणाऱ्या विमारहित (Uninsured) वाहनांची मोठी संख्या लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाने रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय दिला आहे. नवीन वाहनांच्या खरेदीच्या वेळी अनिवार्य असणाऱ्या ‘थर्ड-पार्टी’ (Third-Party) मोटर विम्याची मुदत आता एका वर्षाने वाढवण्यात आली आहे. या नव्या आदेशानुसार, नवीन चारचाकी (कार) वाहनांसाठी ४ वर्षे आणि नवीन दुचाकी वाहनांसाठी ६ वर्षे कालावधीचा थर्ड-पार्टी विमा खरेदी करणे बंधनकारक असणार आहे. न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडापीठाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने २०१८ मधील ‘एस. राजशेखरन विरुद्ध केंद्रीय संघ’ या प्रकरणातील निर्णयानुसार चारचाकींसाठी ३ वर्षे आणि दुचाकींसाठी ५ वर्षांचा विमा अनिवार्य केला होता. मात्र, तब्बल आठ वर्षांनंतरही देशातील सुमारे ५६ टक्के वाहने विम्याशिवाय रस्त्यांवर धावत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, अपघाताच्या वेळी वाहनाचा विमा नसल्यामुळे पीडित नागरिक आणि त्यांच्या कुटुंबियांना भरपाई मिळवण्यासाठी ‘दारादारा भटकंती’ करावी लागते व दीर्घकाळ कायदेशीर लढाई लढावी लागते. त्यामुळे विमा कंपन्यांनी भरपाई देण्यास टाळाटाळ करताना ‘हायपर-टेक्निकल’ (अति-तांत्रिक) दृष्टिकोन ठेवू नये, असा स्पष्ट इशाराही सर्वोच्च न्यायालयाने दिला.
विमा नियमांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी सर्वोच्च न्यायालयाने ‘नो इन्शुरन्स, नो फ्युएल’ (No Insurance, No Fuel) या संकल्पनेवर आधारित उपाययोजना आखण्याचे निर्देश दिले आहेत. ज्या वाहनांचा वैध विमा संपलेला आहे, अशा वाहनांना पेट्रोल पंपांवर पेट्रोल किंवा डिझेल नाकारण्याबाबत IRDAI आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाला प्रायोगिक तत्त्वावर (Pilot Project) विचार करण्याचे निर्देश दिले आहेत. महामार्गांवर बसवलेले ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशन (ANPR) कॅमेरे, ‘वाहनां’ (VAHAN) पोर्टल आणि इन्शुरन्स इन्फॉर्मेशन ब्युरो (IIB) चा डेटा एकत्र जोडण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पोलिसांना मोबाईल ॲपद्वारे तात्काळ विम्याची तपासणी करून ई-चालान फाडण्याचे अधिकार देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
वाहनांची खरेदी करताना ग्राहकांना केवळ थर्ड-पार्टी विम्यापुरते मर्यादित न ठेवता चार पदरी (Four-Tier) विमा पॉलिसीचा पर्याय उपलब्ध करून देण्याचे निर्देश न्यायाधीशांनी दिले आहेत. अनिवार्य थर्ड-पार्टी (३rd Party) विमा, प्रवाशांसाठी/मागील सीटवरील चालकांसाठी ऐच्छिक संरक्षण, वाहन मालक, चालक व इतर प्रवाशांसाठी वैयक्तिक अपघात विमा (Personal Accident Cover), वाहनाच्या स्वतःच्या नुकसानीचे (Own Damage) संरक्षण.
मोटर अपघात दावा प्राधिकरणाकडे (MACT) प्रलंबित असलेल्या जुन्या प्रकरणांच्या वेगाने निकालासाठी ३१ मार्च २०२२ पूर्वीच्या अपघातांचे ‘डिटेल्ड एक्सीडेंट रिपोर्ट’ (DAR), एफआयआर, वैद्यकीय व विमा कागदपत्रे तातडीने सादर करण्याचे निर्देश राज्य पोलिसांना देण्यात आले आहेत. या संपूर्ण आदेशाच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने पुढील सुनावणी १८ ऑगस्ट २०२६ रोजी निश्चित केली आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
परदेशातील प्रगत शेती तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अभ्यासासाठी ‘फार्मर आयडी’धारक शेतकऱ्यांना मिळणार संधी
अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना युरोप आणि चीन अभ्यासदौऱ्याची सुवर्णसंधी; २० ऑगस्टपर्यंत अर्जाचे आवाहन!
अमरावती/पिंपरी, प्रतिनिधी जयकुमार चर्जन दि. ५ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
अमरावती: कृषी विस्तार कार्यक्रमांतर्गत वर्ष २०२६-२७ साठी राज्यातील प्रगतशील शेतकऱ्यांच्या परदेश अभ्यास दौऱ्यांचे आयोजन राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना युरोप आणि चीन या देशांतील शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अभ्यास करण्याची संधी उपलब्ध होणार असून, इच्छुक शेतकऱ्यांनी २० ऑगस्ट २०२६ पर्यंत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
जागतिक पातळीवर कृषी क्षेत्रात होत असलेले आधुनिक बदल, नवनवीन संशोधन आणि विकसित होणारे प्रगत तंत्रज्ञान आपल्या राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत थेट पोहोचावे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
परदेशातील नामांकित कृषी शास्त्रज्ञ व स्थानिक शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करण्याची संधी. परदेशातील कृषी संशोधन संस्था, प्रगत तंत्रज्ञानावर आधारित शेती आणि प्रक्रिया उद्योगांची प्रत्यक्ष पाहणी. परदेशी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून शेतीतील उत्पादन खर्च कमी कसा करावा व उत्पन्न कसे वाढवावे, याचे प्रात्यक्षिक ज्ञान.
अर्जदार व्यक्ती स्वतः शेतकरी असावी आणि शेती हेच त्यांच्या उत्पन्नाचे मुख्य साधन असावे (याबाबतचे स्वयंघोषणापत्र जोडणे अनिवार्य).अर्जदाराकडे ॲग्रीस्टॅक (AgriStack) अंतर्गत ‘फार्मर आयडी’ (Farmer ID) असणे आवश्यक आहे. सहलीच्या दिवशी शेतकऱ्याचे वय किमान २५ वर्षे पूर्ण असावे आणि त्यांच्याकडे वैध पासपोर्ट (Passport) असणे आवश्यक आहे. एका शेतकरी कुटुंबामधून केवळ एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. शेतकरी कोणत्याही शासकीय, निमशासकीय, सहकारी अथवा खाजगी संस्थेत नोकरीला नसावा. अर्जासोबत वैध ओळखपत्राची प्रत जोडणे बंधनकारक आहे.
या योजनेच्या अधिक माहितीसाठी व अर्ज प्रक्रियेसाठी अमरावती जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी आपल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांचा गुन्हेगारांना सज्जड इशारा; अवैध दारू व्यावसायिकांना ‘झिरो टॉलरन्स’ धोरणांतर्गत दणका
पिंपरी-चिंचवड पोलिसांचा अवैध धंद्यांवर सर्जिकल स्ट्राईक! ३ सराईत गुन्हेगारांवर एम.पी.डी.ए. अन्वये कारवाई; १ वर्षासाठी मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. ५ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत दहशत माजवणारे, बेकायदेशीर दारू विक्री करणारे आणि वारंवार गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरोधात पोलीस प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी एम.पी.डी.ए. (MPDA) कायद्यान्वये धडक कारवाई करत ३ अट्टल गुन्हेगारांना प्रत्येकी १ वर्षासाठी मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश जारी केले आहेत. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि अवैध दारू माफ्यांचे जाळे उध्वस्त करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी हा मास्टर प्लॅन तयार केला आहे.
१. कोंडीबा आडेप्पा कांबळे (वय ३७ वर्षे, रा. सुदर्शन नगर, पिंपळे गुरव, पुणे) सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा हा अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर दारू विक्रीचे तब्बल ०९ गुन्हे दाखल आहेत. त्याची रवानगी हरसुल मध्यवर्ती कारागृह (छत्रपती संभाजीनगर) येथे करण्यात आली आहे.
२. जीवन मारुती राजपूत (वय ४८ वर्षे, रा. गोनवडी, ता. खेड, जि. पुणे) उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारू तयार करणे व विकणे यांसारखे १४ गंभीर गुन्हे याच्यावर नोंद आहेत. यालाही हरसुल मध्यवर्ती कारागृह (छत्रपती संभाजीनगर) येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे.
३. धनराज सोमाजी नट (वय ३५ वर्षे, रा. माणरोड, हिंजवडी, पुणे) हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारू विक्रीचे ०४ गुन्हे असलेला हा सराईत गुन्हेगार आहे. याची रवानगी येरवडा मध्यवर्ती कारागृह (पुणे) येथे करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी स्पष्ट केले की, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत अवैध दारू व्यवसायाला पूर्णपणे ‘झिरो टॉलरन्स’ आहे. समाजातील शांतता आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या गुन्हेगारांची अजिबात गय केली जाणार नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सन २०२५ मध्ये एम.पी.डी.ए. कायद्यान्वये ३५ गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली होती. सन २०२६मध्ये (जानेवारी ते जुलै) आतापर्यंत ११ सराईत गुन्हेगारांना एम.पी.डी.ए. अंतर्गत तुरुंगात पाठवण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह-आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आव्हाड, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, पोलीस उप-आयुक्त संदीप आटोळे, श्वेता खेडकर, प्रदीप जाधव, रोहिदास पवार (गुन्हे), सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सुदर्शन राठोड, मनीषा कदम, प्रिया डमाळे आणि विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी (सांगवी), बालाजी पांढरे (हिंजवडी), दिगंबर सूर्यवंशी (उत्तर महाळुंगे) आणि पी.सी.बी. गुन्हे शाखेच्या पथकाने ही कामगिरी फत्ते केली.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
सांगवीत ज्येष्ठ नागरिकांचे वाढदिवस आणि विविध गुणगौरव सोहळा उत्साहात; ज्येष्ठांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्याचा महासंघाचा ठाम निर्धार
ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे मार्गदर्शक आणि विचारांचे विद्यापीठ; पिंपरी-चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्षा वृषालीताई मरळ यांचा नागरी सत्कार!
सांगवी/पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. ४ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: अनुभव, ज्ञान आणि संस्कारांची श्रीमंती जपणारे ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे खऱ्या अर्थाने मार्गदर्शक आणि विचारांचे विद्यापीठ असतात. याच ज्येष्ठांच्या आनंदी, समृद्ध आणि सन्मानजनक आयुष्यासाठी समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या पिंपरी-चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या नवनिर्वाचित अध्यक्षा वृषालीताई मरळ यांचा सांगवी येथे नागरी सत्कार करण्यात आला.
ज्येष्ठ नागरिक संघ (सांगवी परिसर) आणि संत सावतामाळी उद्यान येथे आयोजित जुलै व ऑगस्ट महिन्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या स्नेहमयी वाढदिवस सोहळ्यात त्या बोलत होत्या. “पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व ज्येष्ठ नागरिकांचे प्रलंबित प्रश्न, निवृत्ती वेतन, आरोग्यविषयक समस्या आणि सोयी-सुविधा सोडवण्यासाठी महासंघ पूर्ण ताकदीने आणि कटिबद्धतेने कार्य करेल,” अशी ग्वाही वृषालीताई मरळ यांनी दिली.
कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. याप्रसंगी सांगवी परिसरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ह’ विभाग अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. तृप्तीताई कांबळे (नगरसेविका)नी सर्व ज्येष्ठ महिलांनी परिधान केलेल्या एकसारख्या पारंपरिक साड्यांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या. नवी सांगवी येथील श्री गणेश सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल जवाहर ढोरे (स्थानिक पदाधिकारी) यांचा सत्कार करण्यात आला. ३. ह. भ. प. बंडोपंत शेळके (माजी अध्यक्ष): उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदयजी सामंत आणि आदेश बांदेकर यांच्या हस्ते “वारकरी भूषण पुरस्कार” मिळाल्याबद्दल संघाच्या वतीने ह. भ. प. बंडोपंत शेळके (माजी अध्यक्ष) यांचा विशेष गौरव करण्यात आला.
आपल्या मनोगतात अध्यक्षा वृषालीताई मरळ म्हणाल्या की, पिंपरी-चिंचवड शहरात एकूण १७५ ज्येष्ठ नागरिक संघ कार्यरत असून तब्बल ४० हजार ज्येष्ठ सभासदांची नोंदणी झाली आहे. ज्येष्ठांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महासंघाच्या वतीने लवकरच पिंपरी-चिंचवड मध्यवर्ती ज्येष्ठ महिला भजन स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून त्यात सांगवीच्या महिला भजनी मंडळाला विशेष निमंत्रित केले जाईल.
संघाचे अध्यक्ष कमलाकर जाधव यांनी प्रास्ताविकात सांगितले की, ९ मे १९९७ रोजी डॉ. श्रीराम पांडे यांनी स्थापन केलेला सांगवीतील हा सर्वात जुना आणि सक्रिय संघ आहे. येथे केवळ वाढदिवस नव्हे तर आरोग्य तपासणी शिबिरे, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध स्पर्धांच्या माध्यमातून ज्येष्ठांमध्ये नवचैतन्य निर्माण केले जाते.
या कार्यक्रमात विशेष आकर्षण ठरलेल्या ज्येष्ठ महिला भजनी मंडळाची सुरुवात केल्याबद्दल ह. भ. प. रामदास कामठे काका व सुभद्राताई कामठे यांचा “गुरुपूजन” करून आदर सत्कार करण्यात आला. त्यानंतर महिला भजनी मंडळाने सादर केलेल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या भजनाने संपूर्ण परिसर भक्तीमय झाला. या भजनाला हार्मोनियमवर ह. भ. प. कामठे दादा आणि पखवाजवर रोहिदास ठाकर यांनी सुरेल साथ दिली.
जुलै आणि ऑगस्ट महिन्यात जन्मदिवस असलेल्या सर्व ज्येष्ठ सभासदांचा उपरणे व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. या सोहळ्याला तब्बल १०० हून अधिक स्त्री-पुरुष ज्येष्ठ नागरिक उत्साहाने उपस्थित होते.
या कौटुंबिक व आत्मीय सोहळ्याचे उत्कृष्ट आयोजन संघाचे अध्यक्ष कमलाकर जाधव, सचिव सुरेंद्र शेळके, कोषाध्यक्ष शिवाजी बंडगर, सदस्य गोपाळ गाढवे, स्वीकृत सदस्य सुनील पोकरे तसेच महिला भजनी मंडळाच्या आयोजक अनिता गाढवे, कल्पना देगांवकर व रेखाताई गोरे यांनी केले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन सुरेंद्र शेळके यांनी केले, तर उपस्थितांचे आभार कार्याध्यक्ष विष्णु झाजुर्डे यांनी मानले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.






