
कंत्राटी कामगारांच्या दिवाळी गोड करण्यासाठी कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वाखाली आज पिंपरी पालिकेकडे ‘विनम्र अभियान पदयात्रा’!
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २८ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
“पिंपरी-चिंचवड शहराची निगा राखणाऱ्या, आरोग्याची काळजी घेणाऱ्या आणि अहोरात्र सेवा देणाऱ्या या ४,५०० हून अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या घामाचा मोबदला आणि कायदेशीर हक्क ३ नोव्हेंबरपूर्वी मिळालाच पाहिजे. प्रशासनाने टाळाटाळ केल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल.”— यशवंतभाऊ भोसले (संस्थापक अध्यक्ष, राष्ट्रीय श्रमिक आघाडी)





