news
“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ“७ मार्चच्या जबरी चोरीचा छडा, सोन्याचे मिनी गंठण जप्त!” हिंजवडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; फरार साथीदार विशाल काळेचा शोध सुरू, परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या टोळीला चाप
Home पिंपरी चिंचवड ‘माझी आई…’ या भावनांचा अनादर सहन करणार नाही; भाजपाचे काँग्रेसविरोधात पिंपरी-चिंचवडमध्ये जोरदार आंदोलन

‘माझी आई…’ या भावनांचा अनादर सहन करणार नाही; भाजपाचे काँग्रेसविरोधात पिंपरी-चिंचवडमध्ये जोरदार आंदोलन

शहरभर निषेध, तीव्र घोषणाबाजी; मातृशक्तीच्या सन्मानासाठी भाजपाचा एल्गार. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

 

मातृशक्तीचा अपमान करणाऱ्या काँग्रेसचा भाजपाकडून तीव्र निषेध

 


 

शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन; काँग्रेस कार्यालयाकडे बांगड्या पाठवणार

 

पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी शाम सोनवणे १४ सप्टेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

बिहार निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींचा अपमान केल्याच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये भारतीय जनता पक्षाने जोरदार आंदोलन केले. शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे आणि महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ. सुजाता पालांडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. “स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी” या भारतीय संस्कृतीचा आणि मातृशक्तीचा अवमान करणाऱ्या काँग्रेसच्या विचारधारेचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.


काँग्रेसवर भाजपाचा हल्लाबोल

 

पिंपरी येथील भाजपा पक्ष कार्यालयाजवळ झालेल्या या आंदोलनात शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. “काँग्रेसची विचारधारा नेहमीच विष पेरणारी असून, ती नारीशक्तीचा अवमान करणारी आहे,” असा आरोप त्यांनी केला. पंतप्रधान हे देशाचे असतात आणि त्यांच्या आईबद्दल अपशब्द वापरणे हा देशातील सर्व मातांचा अपमान आहे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. “ही मातृशक्ती कधीही सहन करणार नाही,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.


 

आंदोलनातून तीव्र संदेश

 

या आंदोलनातून काँग्रेसच्या या कृत्याचा तीव्र निषेध करण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत काँग्रेसविरोधात आपला संताप व्यक्त केला. कोणत्याही व्यक्तीने मातृशक्तीचा अनादर केल्यास तो सहन केला जाणार नाही, असा ठाम संदेश या आंदोलनातून देण्यात आला. तसेच, जनतेलाही मातृशक्तीच्या सन्मानासाठी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले.

या आंदोलनात मोरेश्वर शेडगे, वैशाली खाडये, मधुकर बच्चे, राम वाकडकर, राजू दुर्गे, दिनेश यादव, कुणाल लांडगे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. शहरात ठिकठिकाणी मंडलनिहाय आंदोलने झाल्याने काँग्रेसविरोधात तीव्र रोष दिसून आला. मातृशक्तीच्या सन्मानासाठी भाजपाचे हे आंदोलन लक्षवेधी ठरले असून, भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून काँग्रेस पक्ष कार्यालयात बांगड्या पाठवण्यात येणार आहेत.


© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!