news
Home सोलापूर सोलापूरच्या मैदानात ‘महाविकास आघाडी’ विरुद्ध ‘भाजप’

सोलापूरच्या मैदानात ‘महाविकास आघाडी’ विरुद्ध ‘भाजप’

महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला एकटे पाडण्यासाठी महाविकास आघाडीची रणनीती; एकीच्या जोरावर विजयाचा दावा. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

 

सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा वज्रनिर्धार: भाजपला पराभूत करण्यासाठी एकजूट

 

 

‘लुटो, बाटो आणि खाओ’ धोरणावर भाजपला भुईसपाट करण्याचा निर्धार

 

सोलापूर, प्रतिनिधी :- पंडित गवळी, २२ सप्टेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पुढील सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीतील (MVA) सर्व घटक पक्षांनी एकजुटीने लढण्याचा वज्रनिर्धार केला आहे. देशातील भाजप सरकारच्या धोरणांवर टीका करत, आघाडीने स्थानिक पातळीवरूनच भाजपला धूळ चारण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.


महाविकास आघाडीची बैठक आणि रणनीती

सोलापूर येथील लोटस हॉटेलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या पुढाकाराने ही महत्त्वाची बैठक पार पडली. माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत, भाजपने दिलेली खोटी आश्वासने आणि ‘लुटो, बाटो आणि खाओ’ असे धोरण जनतेसमोर उघड करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीत भाजपच्या जाहिरातबाजी आणि घोटाळेबाज धोरणांमुळे जनता त्रस्त झाल्याचे मत व्यक्त करण्यात आले. भाजपला पराभूत करण्यासाठी स्थानिक स्तरावरच लढा सुरू करण्याची गरज असल्याचा निर्धारही या वेळी व्यक्त करण्यात आला.


प्रमुख नेत्यांची उपस्थिती

या बैठकीत काँग्रेस शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, माजी महापौर संजय हेमगड्डी, प्रवक्ते अशोक निंबर्गी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सुधीर खरटमल, माजी महापौर नलिनीताई चंदेले, माजी अध्यक्ष भारत जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख अजय दासरी, जिल्हा उपप्रमुख प्रताप चव्हाण, दत्ता गणेशकर, शहर प्रमुख महेश धाराशिवकर, नाना मोरे, भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी चे जिल्हा सचिव युसुफ शेख मेजर मा. नगरसेविका नसीमा शेख, नलिनीताई कलबुर्गी, ॲड.अनिल वासम, साथी दत्ता चव्हाण, तिरुपती परकीपंडला, चंद्रकांत पवार यांच्यासह महाविकास आघाडीतील अनेक प्रमुख नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या एकजुटीच्या निर्णयामुळे सोलापूर महानगरपालिकेची आगामी निवडणूक अधिक चुरशीची होणार आहे.


© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!