निरोगी भारतासाठी ‘नमो युवा रन’
पिंपरी-चिंचवडमध्ये हजारो नागरिक एकाच ध्येयासाठी धावले; व्यसनमुक्तीचा दिला संदेश
पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी बालाजी नवले २२ सप्टेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा पिंपरी-चिंचवडच्या वतीने ‘नमो युवा रन’ मॅरेथॉनचे भव्य आयोजन करण्यात आले होते. ‘एक दौड मोदीजी के नाम‘ या घोषणेसह सुरू झालेल्या या मॅरेथॉनला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तरुण-तरुणींसह विविध वयोगटांतील हजारो नागरिक यात सहभागी झाले आणि त्यांनी देशभक्ती, निरोगी जीवनशैली आणि व्यसनमुक्तीचा संदेश दिला.
भव्य मॅरेथॉन आणि उत्साह
पिंपळे सौदागर येथील लिनीयर गार्डन येथून रविवारी सकाळी ६ वाजता मॅरेथॉनला सुरुवात झाली. स्पर्धकांनी कोकणे चौकातून ८ ते ८० पार्कपर्यंतचा मार्ग मोठ्या उत्साहात पूर्ण केला. या मॅरेथॉनसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात आले नव्हते, ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनाही यात सहज सहभाग घेता आला. मॅरेथॉन सुरू होण्याआधी झुंबा सत्राने सर्व स्पर्धकांचा उत्साह आणखी वाढवला.
मान्यवर आणि सत्कार सोहळा
भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहर अध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. माजी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची प्रमुख उपस्थिती लाभल्याने या उपक्रमाला विशेष प्रतिष्ठा मिळाली.
या कार्यक्रमाला आमदार महेश लांडगे, भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, जिल्हा संघठन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, विकास डोळस, मधुकर बच्चे, वैशाली खाडये, चंद्रकांत नखाते, महेश कुलकर्णी, प्रवक्ते कुणाल लांडगे, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस सुदर्शन पाटसकर, नमो युवा रनचे संयोजक अमृत मारणे, भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष दिनेश यादव, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष तुषार हिंगे, निवेदिता एकबोटे, युवा मोर्चा प्रदेश सचिव अजित कुलथे, टाटा मोटर्स कामगार संघटनेचे नेते सचिन लांडगे यांच्यासह नगरसेवक -नगरसेविका, प्रदेश पदाधिकारी, युवा मोर्चा पदाधिकारी, विविध प्रकोष्ट पदाधिकारी, अनेक स्थानिक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी इंडियन रोव्हर नॅशनल चॅम्पियन मृण्मयी साळगावकर, आयर्नमॅन भूषण तारक, पराग जोशी, सचिन नेमाडे, सतीश शिंदे, प्रशांत यादव यांच्यासह अनेक खेळाडूंचा विशेष सत्कार करण्यात आला. मॅरेथॉनमधील विजेत्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या मॅरेथॉनचा उद्देश केवळ एक कार्यक्रम साजरा करणे नव्हता, तर युवकांमध्ये देशभक्तीची भावना रुजवून त्यांना व्यसनमुक्ती आणि सुदृढ जीवनशैली स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित करणे हा होता. तरुण, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांच्या मोठ्या सहभागामुळे या कार्यक्रमाला व्यापक स्वरूप आले.
© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


