news
Home पिंपरी चिंचवड ७५ रक्तदात्यांनी दिली जीवदान देणारी साथ! YCM रुग्णालयाच्या शिबिराला चिंचवडे नगरमधून उत्स्फूर्त प्रतिसाद

७५ रक्तदात्यांनी दिली जीवदान देणारी साथ! YCM रुग्णालयाच्या शिबिराला चिंचवडे नगरमधून उत्स्फूर्त प्रतिसाद

कै. अविनाश चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित शिबिरात नागरिकांचा सक्रीय सहभाग; डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्याकडून रक्तदानाचे महत्त्व विशद. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

वायसीएम रुग्णालयाच्या रक्तदान शिबिरात जणांचे उत्स्फूर्त रक्तदान!

 


 

अविनाश युवा प्रतिष्ठानच्या सहकार्याने चिंचवडे नगर येथे आयोजन; आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांचे नागरिकांना आरोग्य उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन.

 

पिंपरी, प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ऑक्टोबर , मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय () यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच अविनाश युवा प्रतिष्ठानच्या सहकार्याने चिंचवडे नगर येथे आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.

चिंचवडे नगर येथील कै. अविनाश उत्तमराव चव्हाण यांच्या अठराव्या स्मृतिदिनानिमित्त या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महापालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेविका करुणा चिंचवडे, सामाजिक कार्यकर्ते शेखर चिंचवडे आणि दत्तात्रय चिंचवडे उपस्थित होते.

 

रक्तदानाचे महत्त्व आणि आवाहन

 

उद्घाटनप्रसंगी बोलताना आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे म्हणाले की, “समाजातील वाढत्या रक्ताच्या गरजेला ओळखून, महापालिका आणि अविनाश युवा प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. वैद्यकीय विभागाच्या वतीने समाजातील नागरिकांनी अशा प्रकारच्या आरोग्यविषयक उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, रक्तदानाचे महत्त्व समजून घेऊन अधिकाधिक जनजागृती घडवावी,” असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रुग्णालयातील रक्तकेंद्राचे रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. गणेश लांडे, समाजसेवा अधीक्षक किशन गायकवाड आणि संपूर्ण कर्मचारीवर्गाने परिश्रम घेतले. तसेच अविनाश युवा प्रतिष्ठानचे अतुल चव्हाण, प्रशांत चिंचवडे, सागर वाघमारे, भरत यादव, बाळा कोरडे, पुष्कर मोहिते, हेमंत भोर, सौरभ पोकळे आदी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजाभाऊ चिंचवडे यांनी केले.


© मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!