news
रहाटणीत नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची धडक कारवाई! गजानन नगरमधील ‘डेथ ट्रॅप’ ठरणारी ड्रेनेज समस्या २४ तासांत केली गुलपिंपरी-चिंचवडमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ५ कोटींची फसवणूक करणारे आहेरकर कुटुंब नेवासामधून अटक! आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाईजागतिक बाजारात सोने गडगडले! स्पॉट गोल्ड ४,१६९ डॉलरवर; अमेरिकन व्याजदर आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार चिंतेतभारतातील म्युझिक इंडस्ट्रीला केंद्र सरकारचे मोठे गिफ्ट; ‘PPL India’ ला मिळाली अधिकृत कॉपीराईट सोसायटी म्हणून मान्यता!मोरवाडीत पिंपरी-चिंचवड भाजपचा भव्य नियुक्ती सोहळा; भुजबळ, नेमाने, भालेराव, मोरे आणि शिर्के यांच्यावर नव्या आघाड्यांची जबाबदारी!
Home पिंपरी चिंचवड वायसीएम रुग्णालयात ‘सफाई मित्रां’चा गौरव; महर्षी वाल्मीकींनी दाखवलेला मानवतेचा संदेश पालिकेकडून साजरा

वायसीएम रुग्णालयात ‘सफाई मित्रां’चा गौरव; महर्षी वाल्मीकींनी दाखवलेला मानवतेचा संदेश पालिकेकडून साजरा

उप आयुक्त अण्णा बोदडे यांच्या हस्ते अभिवादन; सफाई कर्मचाऱ्यांच्या अहोरात्र सेवेची दखल, आरोग्य विभागातील मान्यवरांची उपस्थिती. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

महर्षी वाल्मीकी जयंतीनिमित्त पालिकेकडून अभिवादन: रुग्णालयातील ‘सफाई मित्रां’चा सन्मान

 


 

महापालिकेच्या मुख्य इमारतीत आणि वायसीएम रुग्णालयात उप आयुक्त अण्णा बोदडे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण; सफाई मित्रांचा आदर्श जीवनमूल्यांसाठी गौरव.

 

पिंपरी, प्रतिनिधी शाम सोनवणे,दि. ऑक्टोबर , मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महर्षी वाल्मीकि यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत आणि यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय () येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. उप आयुक्त अण्णा बोदडे यांच्या हस्ते हे अभिवादन करण्यात आले.

महर्षी वाल्मीकि यांनी मानवतेचा, सत्याचा मार्ग दाखवला आणि त्यांच्या आदर्श जीवनमूल्यांचा संदेश समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.

वायसीएम रुग्णालयात सफाई सेवकांचा सत्कार

 

वाल्मीकी जयंतीचे औचित्य साधून, रुग्णालयात आयोजित अभिवादन कार्यक्रमादरम्यान रुग्णालयातील ‘सफाई मित्रां’चा (सफाई सेवक) सन्मान करण्यात आला. आरोग्य विभागात अहोरात्र सेवा देणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या योगदानाची दखल यावेळी घेण्यात आली.

यावेळी अभिवादन करण्यासाठी उप आयुक्त अण्णा बोदडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

महापालिकेच्या मुख्य इमारतीत: माजी नगरसदस्य अरूण टाक, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, विधीतज्ञ ॲड. सागर चरण, मनोज माछरे, गणेश भोसले, अनिल लखन आदी उपस्थित होते.

वायसीएम रुग्णालयात: अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. उज्वला अंदुरकरडॉ. मनीषा सूर्यवंशी, ,विधीतज्ञ ॲड.सागर चरण,डॉ शैलजा भावसार,महादेव बोत्रे,मेट्रन वत्सला वाजे,असिस्टंट मेट्रन स्वाती कुलकर्णी,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,आरोग्य निरीक्षक अमोल गोरखे, मनोज माछरे,गणेश भोसले,अनिल लखन,आरोग्य सहाय्यक मोहन वाघमारे यांच्यासह परिचारिका, कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.


© मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!