news
“येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिली गुन्ह्यांची कबुली!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; महाळुंगे आणि तळेगाव एम.आय.डी.सी. परिसरातील चोरीचे धागेदोरे उघड“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ
Home पिंपरी चिंचवड महावितरणच्या ‘गलथान’ कारभाराचा बोजा ग्राहकांवर; ३५ पैसे ते ९५ पैसे दरवाढ अन्यायकारक!

महावितरणच्या ‘गलथान’ कारभाराचा बोजा ग्राहकांवर; ३५ पैसे ते ९५ पैसे दरवाढ अन्यायकारक!

विविध पक्ष-संघटनांच्या कार्यकर्त्यांनी काळी फीत बांधून भोसरी विभागीय कार्यालयात तीव्र निषेध व्यक्त केला; दरवाढ तातडीने रद्द करण्याची मागणी. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

दिवाळी तोंडावर ‘सुलतानी’ वीज दरवाढ रद्द करा! – मारुती भापकर यांचे महावितरण कार्यालयात आंदोलन

 


 

युनिटमागे पैसे ते पैसे दरवाढीचा ऑक्टोबरपासून ग्राहकांवर बोजा; विविध पक्ष-संघटनांच्या कार्यकर्त्यांनी काळी फीत बांधून भोसरी विभागीय कार्यालयात तीव्र निषेध व्यक्त केला.

 

भोसरी, पिंपरी चिंचवड, प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ऑक्टोबर (प्रतिनिधी), मॅक्स मंथन डेली न्यूज:

महावितरणने ऐन दिवाळीच्या तोंडावर घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांसाठी प्रति युनिट पैसे ते पैसे अशी केलेली ‘सुलतानी’ वीज दरवाढ तातडीने रद्द करावी, या मागणीसाठी ज्येष्ठ माजी नगरसेवक मारुती भापकर यांच्या नेतृत्वाखाली आज (बुधवार, ऑक्टोबर) भोसरी विभागीय कार्यालय, महावितरण येथे निषेध आंदोलन करण्यात आले.

या दरवाढीमुळे सणासुदीच्या काळात सर्व ग्राहकांचे कंबरडे मोडणार असून, महावितरणच्या गलथान कारभाराचा बोजा ग्राहकांवर पडत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

वीज दरवाढीचा तपशील

 

महावितरणने केलेली ही दरवाढ याच ऑक्टोबर महिन्याच्या बिलामध्ये लागू होणार आहे. दरवाढीचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

वीज वापर (युनिट) प्रति युनिट दरवाढ
ते युनिट पैसे
ते युनिट पैसे
ते युनिट पैसे
पेक्षा जास्त युनिट पैसे

आंदोलनातील प्रमुख मागण्या

 

  • तत्काळ दरवाढ रद्द: सर्व वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी ही सुलतानी वीज दरवाढ तातडीने रद्द करावी.
  • महावितरणचा गलथान कारभार: महावितरणच्या भ्रष्ट कारभारामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होतो. कर्मचारी आणि साहित्याची कमतरता असूनही कामे केली जात नाहीत. ग्राहकांना स्वतःच्या खर्चाने सर्व्हिस वायर बदलायला लावणे, भार नियंत्रित न झाल्यामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नुकसान होणे तसेच गंभीर अपघात होऊन नागरिकांचा मृत्यू होणे, याला महावितरणचा गलथान कारभार जबाबदार आहे.

आंदोलकांनी डोक्याला काळी रिबीन बांधून आणि काळे झेंडे दाखवून या दरवाढीचा तीव्र निषेध व्यक्त केला. भोसरी विभागीय कार्यालयाचे मुख्य अभियंता श्री. अतुल देवकर यांनी आंदोलकांकडून निवेदन स्वीकारले आणि सरकारकडे निवेदन पाठवण्याचे आश्वासन दिले.

मुख्यमंत्र्यांना रस्त्यावर उतरण्याचा इशारा

 

यावेळी बोलताना ज्येष्ठ माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रश्नात स्वतःहून लक्ष घालण्याची मागणी केली. त्यांनी इशारा दिला की, सदर दरवाढ लवकरात लवकर कमी न केल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल.

या आंदोलनातयावेळी माजी नगरसेवक मारुती भापकर, मनसे चे शहर उपाध्यक्ष राजू सावळे, काँग्रेस पक्षाचे मनोज कांबळे, नरेंद्र बनसोडे, छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धनाजी येळकर पाटील, मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव, संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष प्रविण कदम, जिवन बोऱ्हाडे, धम्मराज साळवे काशिनाथ जगताप (राष्ट्रवादी श.प.) अरुण पवार, काँग्रेसचे ज्ञानेश्वर मलशेट्टी, सालार शेख, शिवशंकर उबाळे, सुरेश भिसे, विष्णू बिरादार, रावसाहेब गंगाधरे, सोमनाथ शेळके, अनिल करंदीकर,आदेश लुकंड‌, माधव नेरलेकर, काँग्रेसचे बी बी शिंदे, विशाल भालेराव, दीपक भंडारी, सोनवणे प्रताप, सतीश भोसले, आणि देवराम गोरख, हिरामण खवळे, सर्जेराव पाटील, नारायण बिरादार यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


© मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!