news
“येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिली गुन्ह्यांची कबुली!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; महाळुंगे आणि तळेगाव एम.आय.डी.सी. परिसरातील चोरीचे धागेदोरे उघड“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ
Home पिंपरी चिंचवड प्लेसमेंटचा ताण सोडा! योग्य मार्गदर्शन आणि दृढ निश्चयाने ‘उद्योजक’ बना – डॉ. प्रसाद प्रधान

प्लेसमेंटचा ताण सोडा! योग्य मार्गदर्शन आणि दृढ निश्चयाने ‘उद्योजक’ बना – डॉ. प्रसाद प्रधान

पिंपरी-चिंचवड विद्यापीठात 'जनरल अवेअरनेस' सत्राचे आयोजन; डेटा सायन्स आणि औषधनिर्माण क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

‘पीसीयू इन्स्पिरा’ मालिकेत डॉ. प्रधान यांचे मार्गदर्शन: कॉर्पोरेट यशासाठी ‘समस्या निराकरण क्षमता’ सिद्ध करा

 


 

डिजिटलायझेशनच्या युगात लवचिकता, समर्पण आणि उद्योजकतेचा मंत्र; मध्ये विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन सत्राचे आयोजन.

 

पिंपरी, प्रतिनिधी शाम सोनवणे, दि. ऑक्टोबर , मॅक्स मंथन डेली न्यूज:

कार्पोरेट क्षेत्राच्या सतत बदलणाऱ्या आणि वाढणाऱ्या अपेक्षा नव पदवीधरांनी आत्मसात करणे गरजेचे आहे. नोकरी निवडताना आजचा काळ डिजिटलायझेशनचा आहे हे लक्षात घ्या. कामात येणाऱ्या अडथळ्यांवर मात करून, जबाबदारी स्वीकारत समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये सिद्ध करण्याची आवश्यकता आहे, असे मार्गदर्शन पंतप्रधान कार्यालयाचे माजी अर्थ सल्लागार व जागतिक अर्थतज्ञ डॉ. प्रसाद प्रधान यांनी केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या () पिंपरी चिंचवड विद्यापीठात () उद्योग-विद्यापीठ संवाद केंद्राच्या माध्यमातून आयोजित “पीसीयू इन्स्पिरा” या लेक्चर सिरीज अंतर्गत “जनरल अवेअरनेस ऑन कॉर्पोरेट रिक्वायरमेंट फ्रॉम फ्रेशर्स – कॅम्पस टू करिअर” या विषयावर मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते.

करिअरसाठी महत्त्वाच्या टिप्स

 

डॉ. प्रधान यांनी विद्यार्थ्यांना व्यावसायिक यशासाठी आवश्यक असलेले गुण सांगितले:

  • आवश्यक गुण: व्यावसायिक आकांक्षा पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये सहशीलता, स्वभावात लवचिकता हवी आणि समर्पण भावनेने काम करणे आवश्यक आहे.
  • उद्योजकतेची संधी: प्लेसमेंट प्रक्रियेतील ताण-तणाव दूर करण्यासाठी आत्मनिर्भर संकल्पनेचा अंगीकार करावा. योग्य मार्गदर्शन आणि दृढ निश्चयाने अनुभव घेऊन उद्योजक होणे देखील शक्य आहे.
  • वाढत्या संधीची क्षेत्रे: सध्या ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर () धोरणानुसार परदेशी गुंतवणूक वाढत असल्याने रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत आहेत. तसेच, औषधनिर्माण क्षेत्र आणि डेटा सायन्स या क्षेत्रांतील वाढत्या संधी विद्यार्थ्यांसाठी पूरक ठरणार आहेत.

मुंबईतील ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हलमुळे भारताची डिजिटल बँकिंग आणि वित्तीय तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक नेतृत्व क्षमता अधोरेखित झाली असल्याचे डॉ. प्रधान यांनी यावेळी सांगितले. यावेळी कुलगुरू डॉ. गोविंद कुलकर्णी, प्र उपकुलगुरू डॉ. सुदीप थेपडे, औद्योगिक संबंध संचालक डॉ. प्रणव चरखा, मार्केटिंग हेड व समन्वयक जमीर मुल्ला, स्कूल ऑफ मॅनेजमेंटचे विभाग प्रमुख डॉ. अमित पाटील स्कूल ऑफ कॉम्प्युटर एप्लीकेशन चे विभाग प्रमुख डॉ. कमलेश मेश्राम आदी उपस्थित होते.

 

यावेळी चे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी सांगितले की, “पीसीयू इन्स्पिरा” हा उपक्रम विद्यार्थ्यांना उद्योगविश्वातील वास्तव परिस्थितीची ओळख करून देण्यासाठी आणि त्यांना करिअरमध्ये सक्षम बनवण्यासाठी राबवला जातो.

या सत्राला कुलगुरू डॉ. गोविंद कुलकर्णी, प्र-उपकुलगुरू डॉ. सुदीप थेपडे, औद्योगिक संबंध संचालक डॉ. प्रणव चरखा यांच्यासह अनेक विभागप्रमुख व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन अक्षता राजगौरव, आभार संगीता मुखर्जी यांनी मानले. कुलपती तथा पीसीईटीचे विश्वस्त हर्षवर्धन पाटील, पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, उद्योजक अजिंक्य काळभोर, नरेंद्र लांडगे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई,  यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.


© मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!