news
पुण्याहून मुंबईकडे जाताना फॉर्च्युनर कारची टेम्पोला भीषण धडक; कारमधील एक जण गंभीर जखमी, तर तिघे सुदैवाने बचावलेसुगम बदली आणि शासकीय लाभ मिळवण्यासाठी बोगस दाखल्यांचा वापर; त्रिसदस्यीय चौकशी समितीच्या अहवालानंतर मोठी कारवाईशिक्षण सुधारणा आणि बेरोजगारीला राष्ट्रीय मुद्दा बनवण्याचा संकल्प; मुख्य प्रवक्ते सौरव दास, प्रवक्ते आशुतोष रांका यांच्यासह कोअर टीमच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णयअभ्यागतांच्या तक्रारी व निवेदने प्रत्यक्ष ऐकून घेत स्थळपाहणी व तातडीने कार्यवाहीचे आदेश; दर गुरुवारी ४ ते ६ नागरिकांसाठी विशेष वेळ राखीवपक्षाची धोरणे जनतेपर्यंत पोहोचवणे आणि विरोधकांच्या अपप्रचाराला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी निष्ठावंत कार्यकर्त्याला मोठी संधी
Home पिंपरी चिंचवड भीमसृष्टी, दापोडी चौक येथे महामानवाला पुष्पहार अर्पण! महापालिकेच्या वतीने महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन

भीमसृष्टी, दापोडी चौक येथे महामानवाला पुष्पहार अर्पण! महापालिकेच्या वतीने महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन

उप आयुक्त अण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, मारूती भापकर, माई काटे यांच्यासह मान्यवरांनी केले विनम्र अभिवादन. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

संविधानातील मूल्यांचे जतन हीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना खरी आदरांजली: अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर

 

 

महापरिनिर्वाण दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने शहराच्या विविध भागांतील पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ६ डिसेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या कार्य, विचार आणि योगदानाचा गौरव करताना भारतीय संविधानाने देशाला दिलेल्या समानता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता या मूल्यांचे जतन व अंमलबजावणी करणे हेच खरे अभिवादन ठरेल, असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी केले.

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी असलेल्या त्यांच्या प्रतिमा व पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, त्यावेळी तृप्ती सांडभोर बोलत होत्या.

अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस, तसेच शहरातील भीमसृष्टी पिंपरी चौक, हिंदुस्थान अँटीबायोटीक्स कंपनी (HA Company) आणि दापोडी चौक येथील पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी उपस्थित असलेले मान्यवर आणि अधिकारी:

  • महापालिका अधिकारी: उप आयुक्त अण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, उप अभियंता आकाश ठोकळ.

  • भीमसृष्टी पिंपरी चौक: माजी नगरसदस्य मारूती भापकर, सामाजिककार्यकर्ते बापूसाहेब गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश भुक्तर, मुकेश जगताप.

  • हिंदुस्थान अँटीबायोटीक्स कंपनी (HA Company): सामाजिक कार्यकर्ते मिलींद जाधव, संजय केंगले, रविंद्र कांबळे, मधु फलके, रमेश जाधव, सुरेंद्र पासलकर, मारूती लोखंडे, मारूती बोरावके, सुनिल रिकामे.

  • दापोडी चौक: पोलीस उपनिरीक्षक राजीव भास्कर, माजी नगरसदस्या माई काटे, चंद्रकांता सोनकांबळे तसेच विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!