news
पिंपरीतील ‘श्रीटिकेल’ कंपनीच्या २७५ कामगारांनी केले रक्तदान; ‘वायसीएम’ मधील गरीब रुग्णांना मिळणार जीवनदान!पिंपरी-चिंचवडमधील १३४ मनपा शाळांमध्ये सुट्टीच्या दिवशी घुमला ‘ओंकार’ नाद! आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभागपिंपरी-चिंचवड मनपा आणि योग विद्या धामच्या संयुक्त विद्यमाने ‘एक पृथ्वी, एक आरोग्य’ संकल्पनेवर भव्य योग सोहळा!रहाटणीत आंतरराष्ट्रीय योगदिनाचा उत्साह! आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी महाराज उद्यानात सामूहिक योगसाधनापिंपरी मनपा मुख्यालयाबाहेर ‘मॅक्स मंथन’च्या बातमीचा महाप्रभाव! ‘डेथ ट्रॅप’ ठरलेले ड्रेनेज चेंबर सुट्टीच्या दिवशी युद्धपातळीवर दुरुस्त
Home पिंपरी चिंचवड महापरिनिर्वाण दिनी पिंपरी-चिंचवडमध्ये महामानवाला मानवंदना! अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांची भीमसृष्टी, HA कंपनी येथे उपस्थिती

महापरिनिर्वाण दिनी पिंपरी-चिंचवडमध्ये महामानवाला मानवंदना! अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांची भीमसृष्टी, HA कंपनी येथे उपस्थिती

माजी नगरसदस्य मारूती भापकर, माजी नगरसदस्या माई काटे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते प्रकाश भुक्तर, मुकेश जगताप यांनीही केले विनम्र अभिवादन. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

संविधानातील ‘समानता, न्याय, बंधुता’ मूल्यांचे जतन हीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना खरी आदरांजली: अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर

 

 

महापरिनिर्वाण दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहराच्या विविध भागांतील पुतळ्यांना अभिवादन

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ६ डिसेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज: 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या कार्य, विचार आणि योगदानाचा गौरव करताना भारतीय संविधानाने देशाला दिलेल्या समानता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता या मूल्यांचे जतन व अंमलबजावणी करणे हेच खरे अभिवादन ठरेल, असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी केले.

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी असलेल्या त्यांच्या प्रतिमा व पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, त्यावेळी तृप्ती सांडभोर बोलत होत्या.

अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस, तसेच शहरातील भीमसृष्टी पिंपरी चौक आणि हिंदुस्थान अँटीबायोटीक्स कंपनी (HA Company) येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

दापोडी चौक येथील कार्यक्रमात उप आयुक्त अण्णा बोदडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी खालील मान्यवर आणि अधिकारी उपस्थित होते:

  • महापालिका अधिकारी: अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उप आयुक्त अण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, उप अभियंता आकाश ठोकळ.

  • भीमसृष्टी आणि मुख्य इमारत: सामाजिक कार्यकर्ते प्रकाश भुक्तर, मुकेश जगताप, माजी नगरसदस्य मारूती भापकर, सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब गायकवाड.

  • हिंदुस्थान अँटीबायोटीक्स कंपनी (HA Company): सामाजिक कार्यकर्ते मिलींद जाधव, संजय केंगले, रविंद्र कांबळे, मधु फलके, रमेश जाधव, सुरेंद्र पासलकर, मारूती लोखंडे, मारूती बोरावके, सुनिल रिकामे.

  • दापोडी चौक: पोलीस उपनिरीक्षक राजीव भास्कर, माजी नगरसदस्या माई काटे, चंद्रकांता सोनकांबळे तसेच विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!