news
Home अमरावती अमरावतीतील युवकांना ‘अमृत’ची नवी दिशा! प्रशिक्षण, रोजगार आणि उद्योजकतेसाठी स्थानिक पातळीवर सुविधा उपलब्ध

अमरावतीतील युवकांना ‘अमृत’ची नवी दिशा! प्रशिक्षण, रोजगार आणि उद्योजकतेसाठी स्थानिक पातळीवर सुविधा उपलब्ध

व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांचे स्पष्टीकरण; सिद्धेश्वर वरणगावकर, दीपक जोशी, मंगेश खाडीलकर यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज.)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

‘अमृत’च्या अमरावती विभागीय कार्यालयाचे उद्घाटन; खुल्या गटातील दुर्बलांना कौशल्य विकास आणि रोजगाराची संधी

 

 

व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंरोजगार आणि औद्योगिक मार्गदर्शनाला मिळणार गती

अमरावती, प्रतिनिधी अविनाश वानखेडे, दि.११ डिसेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

खुल्या गटातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असलेल्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (‘अमृत’ – AMRU) च्या अमरावती विभागीय कार्यालयाचे उद्घाटन बुधवारी (दि. १० डिसेंबर २०२५) उत्साहात पार पडले.

अमरावती येथील आशीर्वाद बिल्डिंग, मालटकेडी समोर, बसस्टँड रोड, टोपेनगर येथे या कार्यालयाचे उद्घाटन संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांच्या हस्ते करण्यात आले.

व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी यावेळी सांगितले की, अमरावती जिल्ह्यात ‘अमृत’चे कार्यालय सुरू झाल्यामुळे कौशल्य विकास, प्रशिक्षण, रोजगारनिर्मिती, प्रमाणपत्र अभ्यासक्रम, स्वयंरोजगार संधी आणि औद्योगिक मार्गदर्शन अधिक सुलभ आणि प्रभावीपणे उपलब्ध होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील युवकांना रोजगार व उद्योजकतेच्या नव्या दिशांना चालना मिळणार आहे.

‘अमृत’ संस्था राज्यात विविध उपक्रम राबवून युवकांना रोजगारक्षम बनविण्यासाठी सातत्याने प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि औद्योगिक कौशल्य विकासाचे प्रबोधन करत आहे. आता या सर्व सुविधा अमरावतीमध्ये स्थानिक पातळीवर उपलब्ध होत असल्याने अनेक उपक्रमांची अंमलबजावणी जलदगतीने होणार आहे.

या उद्घाटन समारंभाला प्रबंधक संचालक सिद्धेश्वर वरणगावकर, राज्य व्यवस्थापक दीपक जोशी, नाशिक विभागीय व्यवस्थापक मंगेश खाडीलकर, अमरावती विभाग व्यवस्थापक प्रवीण कोळेश्वर, तसेच जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटूरवार उपस्थित होते. यावेळी विविध उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते तसेच अमृतचे लाभार्थी यांनी भेटी घेतल्या.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!