news
Home अमरावती बंद्यांना हक्क आणि कर्तव्ये यांची माहिती! अमरावती कारागृहात मानवी हक्क आयोगाच्या सहकार्याने विशेष कार्यक्रम

बंद्यांना हक्क आणि कर्तव्ये यांची माहिती! अमरावती कारागृहात मानवी हक्क आयोगाच्या सहकार्याने विशेष कार्यक्रम

न्यायरक्षक कार्यालयाचे ॲड. अमित सहारकर यांचे मार्गदर्शन; अधीक्षक किर्ती चिंतामणी, उपअधीक्षक प्रदीप इंगळे यांची उपस्थिती. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

अमरावती मध्यवर्ती कारागृहात ‘मानवी हक्क आणि संरक्षण’ विषयावर कायदेविषयक जागृती

 

 

आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिनानिमित्त बंद्यांसाठी कार्यक्रमाचे आयोजन; शिस्तीचे पालन करून मानवी मूल्ये जपण्याचे पोलीस आयुक्तांचे आवाहन

 

अमरावती, प्रतिनिधी अविनाश वानखेडे, दि.११ डिसेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

अमरावती मध्यवर्ती कारागृहात बुधवार (दि. १० डिसेंबर २०२५) रोजी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवसाचे औचित्य साधून बंद्यांसाठी ‘मानवी हक्क आणि संरक्षण’ या विषयावर कायदेविषयक जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, मानवी हक्क आयोग आणि कारागृह विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला.

बंद्यांना त्यांच्या मानवी हक्कांची माहिती व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी पोलीस आयुक्त अरविंद चावरीया, अधीक्षक किर्ती चिंतामणी आणि ॲड. अमित सहारकर उपस्थित होते.

पोलीस आयुक्त अरविंद चावरीया यांनी कारागृहातील बंद्यांना शिस्तीचे वर्तन करून नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “मानवी अधिकाराचे उल्लंघन झाल्यास कायदा आहे, त्यामुळे कोणाच्याही अधिकाराचे उल्लंघन करू नये. सर्व धर्मग्रंथांचे वाचन केल्यास मानवी मूल्ये जपली जातील. तसेच, स्वतःमधील मीपणाची भावना कमी झाल्यास मानवी मूल्ये जपता येतील.”

न्यायरक्षक कार्यालयाचे ॲड. अमित सहारकर यांनी बंद्यांना त्यांचे कारागृहातील हक्क व कर्तव्ये याविषयी सविस्तर माहिती दिली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डी. एस. वमने यांनी केले, तर सूत्रसंचालन कारागृह शिक्षक ललित मुंडे यांनी केले. कारागृह अधीक्षक किर्ती चिंतामणी यांनी आभार मानले.

या कार्यक्रमासाठी कारागृहातील उपअधीक्षक प्रदीप इंगळे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी देवराव जाधव, शामराव गिते, मंडल तुरुंगाधिकारी धनसिंग कवाळे, कारागृह शिक्षक संजय घोलप, प्रवीण धर्माळे, गोपाल कचरे, सुभेदार राहुल पंधरे, उमेश साबळे, कृष्णकांत सांबारे, पवन ईखार, यादव कातोरे यांनी पुढाकार घेतला.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!