news
Home अमरावती माजी सैनिकांच्या कल्याणासाठी अमरावती जिल्हा अव्वल! लक्ष्यापेक्षा ४१ लाख अधिक ध्वजदिन निधी संकलित

माजी सैनिकांच्या कल्याणासाठी अमरावती जिल्हा अव्वल! लक्ष्यापेक्षा ४१ लाख अधिक ध्वजदिन निधी संकलित

जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांना राज्यपालांच्या स्वाक्षरीचे प्रशस्तीपत्र; मेजर आनंद पाठारकर यांची उपस्थिती. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

ध्वजदिन निधी संकलनात अमरावती जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी; राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचा सत्कार

 

 

१.२३ कोटींच्या लक्ष्याऐवजी १.६४ कोटींचा निधी संकलित; विभागात अव्वल स्थान पटकावल्याने गौरव

अमरावती, प्रतिनिधी अविनाश वानखेडे, दि.११ डिसेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

ध्वजदिन निधी संकलनात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचा सत्कार राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते करण्यात आला. मुंबई येथील लोकभवनातील जय विहार येथे हा कार्यक्रम पार पडला. राज्यपालांच्या स्वाक्षरीचे प्रशस्तीपत्र आणि स्मृती चिन्ह देऊन हा गौरव करण्यात आला.

या सत्कारावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर आनंद पाठारकर उपस्थित होते. अमरावती जिल्ह्याला २०२४-२५ या वर्षासाठी १ कोटी २३ लाख रुपयांचे लक्ष्य देण्यात आले होते. त्या तुलनेत जिल्ह्याने तब्बल १ कोटी ६४ लाख रुपयांचा निधी संकलित केला आहे.

  • जिल्ह्याने निधी संकलनात अमरावती विभागात अव्वल स्थान पटकावले असल्याने हा सन्मान करण्यात आला.

  • संकलित करण्यात आलेला हा अतिरिक्त निधी माजी सैनिक आणि त्यांच्या अवलंबितांच्या कल्याण, पुनर्वसन तसेच विविध कल्याणकारी योजना राबवण्यासाठी उपयोगात आणल्या जाणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी इष्टांकापेक्षा अधिक निधी गोळा केल्यामुळे युद्धविधवा, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी मदत होणार आहे.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!