news
शिक्षण सुधारणा आणि बेरोजगारीला राष्ट्रीय मुद्दा बनवण्याचा संकल्प; मुख्य प्रवक्ते सौरव दास, प्रवक्ते आशुतोष रांका यांच्यासह कोअर टीमच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णयअभ्यागतांच्या तक्रारी व निवेदने प्रत्यक्ष ऐकून घेत स्थळपाहणी व तातडीने कार्यवाहीचे आदेश; दर गुरुवारी ४ ते ६ नागरिकांसाठी विशेष वेळ राखीवपक्षाची धोरणे जनतेपर्यंत पोहोचवणे आणि विरोधकांच्या अपप्रचाराला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी निष्ठावंत कार्यकर्त्याला मोठी संधीदिल्ली मेट्रो, नाशिक कुंभमेळा जलसुविधा प्रकल्पासह ऊर्जा आणि सौर क्षेत्रातील मोठ्या ऑर्डर्स प्राप्त; कंपनीची व्यवसायात सातत्यपूर्ण घोडदौडशहराच्या पाणीपुरवठ्याला बाधा न आणता प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांवर संवेदनशीलतेने टप्प्याटप्प्याने कार्यवाही करण्याचे महापौरांचे आश्वासन
Home पिंपरी चिंचवड उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी तांत्रिक चुका टाळा! निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे विशेष मार्गदर्शन सत्र

उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी तांत्रिक चुका टाळा! निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे विशेष मार्गदर्शन सत्र

प्रभाग २५ ते २९ मधील इच्छुकांसाठी सोमवारी रहाटणीत बैठक; निवडणूक आयोगाच्या नवीन मार्गदर्शक सूचनांची दिली जाणार माहिती. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड मनपा निवडणूक: प्रभाग २५, २६, २८ आणि २९ मधील उमेदवारांसाठी उद्या महत्त्वाची बैठक

 

 

नामनिर्देशन प्रक्रिया सुलभ होण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे आयोजन; इच्छुक उमेदवारांना उपस्थित राहण्याचे आवाहन

पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, दि.२१ डिसेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज: 

पिंपरी (दि. २१ डिसेंबर २०२५): पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ चा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला असून, त्याअनुषंगाने निवडणूक प्रशासनाने कंबर कसली आहे. आगामी मंगळवार दि. २३ डिसेंबर २०२५ पासून उमेदवारी अर्ज (नामनिर्देशनपत्र) दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. ही प्रक्रिया सुलभ व्हावी आणि उमेदवारांना निवडणूक नियमांची सविस्तर माहिती मिळावी, यासाठी प्रभाग क्र. २५, २६, २८ व २९ च्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी विशेष बैठकीचे आयोजन केले आहे.


  • दिनांक: २२ डिसेंबर २०२५ (सोमवार)

  • वेळ: सकाळी ११.०० वाजता

  • ठिकाण: निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, रहाटणी १७.

प्रभाग क्रमांक २५, २६, २८ आणि २९ मध्ये निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले:

१. सर्व राजकीय पक्षांचे उमेदवार किंवा त्यांचे अधिकृत प्रतिनिधी.

२. इच्छुक अपक्ष उमेदवार किंवा त्यांचे अधिकृत प्रतिनिधी.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील निवडणूक नियमांनुसार, नामनिर्देशनपत्र भरताना कोणतीही तांत्रिक चूक होऊ नये, अर्जासोबत कोणती कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे आणि निवडणूक आयोगाच्या नवीन मार्गदर्शक सूचना काय आहेत, यावर या बैठकीत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.

सहा. निवडणूक निर्णय अधिकारी (प्रभाग क्र. २५, २६, २८ व २९) यांनी सर्व संबंधितांना या बैठकीसाठी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. निवडणूक प्रक्रिया निर्भय आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशासकीय स्तरावर ही महत्त्वाची तयारी मानली जात आहे.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!