news
रहाटणीत नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची धडक कारवाई! गजानन नगरमधील ‘डेथ ट्रॅप’ ठरणारी ड्रेनेज समस्या २४ तासांत केली गुलपिंपरी-चिंचवडमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ५ कोटींची फसवणूक करणारे आहेरकर कुटुंब नेवासामधून अटक! आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाईजागतिक बाजारात सोने गडगडले! स्पॉट गोल्ड ४,१६९ डॉलरवर; अमेरिकन व्याजदर आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार चिंतेतभारतातील म्युझिक इंडस्ट्रीला केंद्र सरकारचे मोठे गिफ्ट; ‘PPL India’ ला मिळाली अधिकृत कॉपीराईट सोसायटी म्हणून मान्यता!मोरवाडीत पिंपरी-चिंचवड भाजपचा भव्य नियुक्ती सोहळा; भुजबळ, नेमाने, भालेराव, मोरे आणि शिर्के यांच्यावर नव्या आघाड्यांची जबाबदारी!
Home पिंपरी चिंचवड प्रभाग ३२ आणि १९ मध्ये ‘कांटे की टक्कर’! अर्जांच्या वाटपात ‘ह’ कार्यालय अव्वल; राजकीय मैदानात इच्छुकांची मोठी फळी

प्रभाग ३२ आणि १९ मध्ये ‘कांटे की टक्कर’! अर्जांच्या वाटपात ‘ह’ कार्यालय अव्वल; राजकीय मैदानात इच्छुकांची मोठी फळी

प्रभागनिहाय आकडेवारीने वाढविली धाकधूक; एका जागेसाठी अनेक दावेदार रिंगणात; बंडखोरी थोपवण्याचे पक्षांसमोर आव्हान. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड मनपा निवडणूक: अर्जांच्या वितरणात ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाची बाजी; एकाच दिवशी ३१३ अर्जांची उचल

 

 

प्रभाग निहाय चुरस वाढली; ‘अ’ आणि ‘ह’ कार्यालयांत इच्छुकांची तुफान गर्दी

पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, दि.२५डिसेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज: 

पिंपरी (दि. २५ डिसेंबर २०२५): पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र (उमेदवारी अर्ज) घेण्याच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. ताज्या आकडेवारीनुसार, शहरातील ८ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमधून मोठ्या प्रमाणावर अर्जांचे वितरण झाले असून, यामध्ये ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाने सर्वाधिक ३१३ अर्जांसह आघाडी घेतली आहे. तर ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय २६० अर्जांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिले आहे.


विविध प्रभागांमधील राजकीय चुरस आता अर्जांच्या संख्येवरून स्पष्ट होऊ लागली आहे. कार्यालयानुसार झालेली प्रभागनिहार विभागणी खालीलप्रमाणे आहे:

१. ह क्षेत्रीय कार्यालय (एकूण ३१३ अर्ज – सर्वाधिक)

येथे सर्वाधिक उत्साह पाहायला मिळाला असून प्रभाग क्र. ३२ मध्ये सर्वाधिक ९२ अर्ज नेण्यात आले आहेत.

  • प्रभाग ३२: ९२ | प्रभाग ३१: ६८ | प्रभाग ३०: ६८ | प्रभाग २०: ८५

२. अ क्षेत्रीय कार्यालय (एकूण २६० अर्ज)

चिंचवड आणि आसपासच्या परिसरातून इच्छुकांची मोठी गर्दी झाली.

  • प्रभाग १९: ९२ | प्रभाग १०: ६९ | प्रभाग १५: ५२ | प्रभाग १४: ४७

३. फ क्षेत्रीय कार्यालय (एकूण १६५ अर्ज)

  • प्रभाग ११: ८० | प्रभाग १: ३३ | प्रभाग १३: ३२ | प्रभाग १२: २०

४. ड क्षेत्रीय कार्यालय (एकूण १५५ अर्ज)

  • प्रभाग २५: ६९ | प्रभाग २९: ३९ | प्रभाग २६: ३७ | प्रभाग २८: १०

५. ब क्षेत्रीय कार्यालय (एकूण १५२ अर्ज)

  • प्रभाग १६ व २२: प्रत्येकी ४७ | प्रभाग १७: ३३ | प्रभाग १८: २५

६. क क्षेत्रीय कार्यालय (एकूण १३९ अर्ज)

  • प्रभाग ९: ५० | प्रभाग ८: ३५ | प्रभाग ६: २८ | प्रभाग २: २६

७. इ क्षेत्रीय कार्यालय (एकूण १२७ अर्ज)

  • प्रभाग ३: ४३ | प्रभाग ७: ३३ | प्रभाग ४: २९ | प्रभाग ५: २२

८. ग क्षेत्रीय कार्यालय (एकूण १२२ अर्ज)

  • प्रभाग २३: ४३ | प्रभाग २७: ३२ | प्रभाग २१: २८ | प्रभाग २४: १९


अर्जांच्या वितरणाची ही आकडेवारी पाहता, अनेक प्रभागांमध्ये एका जागेसाठी १० ते १५ उमेदवार रिंगणात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विशेषतः प्रभाग क्र. ३२, १९ आणि २० मध्ये इच्छुकांची संख्या सर्वाधिक असल्याने येथे मोठी बंडखोरी किंवा अपक्ष उमेदवारांचा भरणा राहण्याची चिन्हे आहेत. महापालिका प्रशासनाने सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये अर्ज स्वीकारण्यासाठी आणि वितरणासाठी चोख व्यवस्था केली असून, शांततेत प्रक्रिया पार पाडण्याचे आवाहन केले आहे.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!