news
रहाटणीत नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची धडक कारवाई! गजानन नगरमधील ‘डेथ ट्रॅप’ ठरणारी ड्रेनेज समस्या २४ तासांत केली गुलपिंपरी-चिंचवडमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ५ कोटींची फसवणूक करणारे आहेरकर कुटुंब नेवासामधून अटक! आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाईजागतिक बाजारात सोने गडगडले! स्पॉट गोल्ड ४,१६९ डॉलरवर; अमेरिकन व्याजदर आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार चिंतेतभारतातील म्युझिक इंडस्ट्रीला केंद्र सरकारचे मोठे गिफ्ट; ‘PPL India’ ला मिळाली अधिकृत कॉपीराईट सोसायटी म्हणून मान्यता!मोरवाडीत पिंपरी-चिंचवड भाजपचा भव्य नियुक्ती सोहळा; भुजबळ, नेमाने, भालेराव, मोरे आणि शिर्के यांच्यावर नव्या आघाड्यांची जबाबदारी!
Home पिंपरी चिंचवड “सावित्रीबाईंच्या विचारांनीच महिला सक्षमीकरणाची पहाट”; पिंपरी-चिंचवडमध्ये कष्टकरी महिलांचा जागर

“सावित्रीबाईंच्या विचारांनीच महिला सक्षमीकरणाची पहाट”; पिंपरी-चिंचवडमध्ये कष्टकरी महिलांचा जागर

शिक्षिका सारिका शिंदे व रेखा नायडू यांचा गौरव; विषमतेच्या भिंती तोडणाऱ्या सावित्रीमाईंच्या संघर्षाला कष्टकरी संघर्ष महासंघाची मानवंदना. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज.)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

सावित्रीबाईंनी शोषित महिलांना मिळवून दिले मानाचे स्थान; पिंपरी-चिंचवडमध्ये कष्टकरी महिलांचा सन्मान

 

 

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त महिला मेळावा; ज्ञान आणि संघर्षाचा वारसा जपण्याचा कामगार नेत्यांचा निर्धार

पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, दि. ३ जानेवारी २०२६, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी (दि. ३ जानेवारी २०२६): “महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी विषमतेने ग्रासलेल्या समाजात स्त्रिया व शोषितांना सन्मानाचे स्थान मिळावे, यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. सावित्रीबाई केवळ शिक्षिका नव्हत्या, तर त्या क्रांतिकारी विचारांच्या आणि महिला सक्षमीकरणाच्या खऱ्या अग्रदूत होत्या,” असे प्रतिपादन कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केले.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र राज्य, कष्टकरी घरेलू कामगार संघर्ष महासंघ आणि महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘महिला सन्मान मेळाव्यात’ ते बोलत होते.


या सोहळ्याचे आयोजन पिंपरी-चिंचवडमध्ये करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला अध्यक्षा माधुरी जलमूलवार होत्या. याप्रसंगी समाजासाठी योगदान देणाऱ्या शिक्षिका सारिका शिंदेरेखा नायडू यांच्यासह विविध क्षेत्रांतील कष्टकरी महिलांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

काशिनाथ नखाते यांनी आपल्या भाषणात फुले दांपत्याच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले की, “अंधश्रद्धा आणि जुनाट रूढी-परंपरांच्या विळख्यातून समाजाला मुक्त करण्यासाठी ज्ञान हाच एकमेव मार्ग आहे, हे ओळखून सावित्रीबाईंनी मुलींसाठी शिक्षणाची दारे उघडली. त्यांच्या लेखणीने आणि कृतीने सांस्कृतिक वर्चस्ववादाला मोठे आव्हान दिले.”

अध्यक्षीय भाषणात माधुरी जलमूलवार यांनी सावित्रीबाईंच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला. “सावित्रीबाईंनी विधवा महिलांना आधार दिला, केशवपनासारख्या अमानवी प्रथेविरोधात नाव्ह्यांचा संप घडवून आणला आणि आपल्या घरातील पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला करून समतेचा संदेश दिला. त्यांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे,” असे त्या म्हणाल्या.

उपस्थित मान्यवर:

या मेळाव्यास बांधकाम विभागाच्या महिला अध्यक्षा अर्चना कांबळे, सुनीता पोतदार, कलावती पाल, वत्सला ठोकळ, सुमित्रा जैस्वाल, मालन चव्हाण, वनमाला कांबळे, सुनंदा साबळे यांसह मोठ्या संख्येने कष्टकरी महिला उपस्थित होत्या.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!