news
रहाटणीत नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची धडक कारवाई! गजानन नगरमधील ‘डेथ ट्रॅप’ ठरणारी ड्रेनेज समस्या २४ तासांत केली गुलपिंपरी-चिंचवडमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ५ कोटींची फसवणूक करणारे आहेरकर कुटुंब नेवासामधून अटक! आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाईजागतिक बाजारात सोने गडगडले! स्पॉट गोल्ड ४,१६९ डॉलरवर; अमेरिकन व्याजदर आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार चिंतेतभारतातील म्युझिक इंडस्ट्रीला केंद्र सरकारचे मोठे गिफ्ट; ‘PPL India’ ला मिळाली अधिकृत कॉपीराईट सोसायटी म्हणून मान्यता!मोरवाडीत पिंपरी-चिंचवड भाजपचा भव्य नियुक्ती सोहळा; भुजबळ, नेमाने, भालेराव, मोरे आणि शिर्के यांच्यावर नव्या आघाड्यांची जबाबदारी!
Home मुख्यपृष्ठ गाव भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले! श्री संत भैय्याजी महाराज संस्थान ते शेगाव पायदळ वारी रवाना; ७ वर्षांची परंपरा अखंड

गाव भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले! श्री संत भैय्याजी महाराज संस्थान ते शेगाव पायदळ वारी रवाना; ७ वर्षांची परंपरा अखंड

रांगोळ्यांच्या पायघड्या आणि सडा-सारवण करून वारीचे स्वागत; ११ जानेवारीला श्रीक्षेत्र शेगावात होणार पालखीचा सांगता समारंभ. (© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

जसापूरवासीयांनी दिला गजानन वारीतून एकात्मतेचा संदेश; शेगावकडे निघाली भक्तिभावाने ओतप्रोत पालखी पायदळ वारी


दर्यापूर, १७ जानेवारी २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज :

गावगाड्याच्या संस्कृतीचे जतन करत जसापूर (भडांगे) वासियांनी गजानन माऊली वारी पालखी सोहळ्यातून सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा आदर्श घालून दिला आहे. संपूर्ण गावात सडा-सारवण आणि आकर्षक रांगोळ्यांच्या पायघड्या घालून, जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन हा भक्तीचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला.

श्री संत भैय्याजी महाराज जसापूर (भडांगे) ते श्रीक्षेत्र शेगाव ही पवित्र पालखी पायदळ वारी बुधवारी, ७ जानेवारी रोजी भक्तीमय वातावरणात रवाना झाली. ह.भ.प. रामकृष्ण महाराज अकोटकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ह.भ.प. धनेश महाराज ढोके व ह.भ.प. प्रदीप रोडे महाराज यांच्या उपस्थितीत या सोहळ्याला प्रारंभ झाला. ही दिंडी ११ जानेवारी रोजी श्रीक्षेत्र शेगाव येथे पोहोचणार असून तिथे पालखी सोहळ्याचा सांगता समारंभ पार पडणार आहे.

वारीच्या प्रारंभी गावातील मंदिरात पालखीची विधिवत पूजा-अर्चा करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण गावातून पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. “जय गजानन माऊली”च्या जयघोषात भाविक पावल्या खेळत होते. प्रत्येक घरासमोर पालखीचे पूजन करण्यात आले. भाविकांच्या या अपार श्रद्धेने संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले होते.

या पालखी सोहळ्यात सेवाधारी आशिष काळे, विणेकरी ह.भ.प. प्रतीक महाराज भडांगे, गायनाचार्य ह.भ.प. विठोबा पांडे, ह.भ.प. पवन काढणे, ह.भ.प. विनोद भडांगे, ह.भ.प. ज्ञानेश्वरी पाटेकर, ह.भ.प. विजयाताई रोडे, मृदंगाचार्य ह.भ.प. गजानन भारसाकडे, ह.भ.प. जय पाटेकर, ह.भ.प. गोकुळ राऊत, ह.भ.प. विलास भडांगे, ह.भ.प. ऋषिकेश मेहरे, मधुकर मेहरे, प्रवीण नागे, सुनील भडांगे, अल्पेश, सोहम राऊत यांच्यासह जसापूर, नायगाव, भांबोरा, आराळा आदी गावांतील असंख्य भक्त सहभागी झाले आहेत.

“जाती–धर्माच्या पलीकडे भक्ती”

गेल्या सात वर्षांपासून जसापूर (भडांगे) गावातून शेगावकडे ही पायदळ वारी अखंडपणे निघत आहे. या वारीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे सर्व जाती-धर्मातील नागरिकांचा यात असलेला उत्स्फूर्त सहभाग. धर्मसहिष्णुता आणि सामाजिक सलोखा जपणारी ही वारी परिसरातील भाविकांसाठी एक मोठी प्रेरणा ठरली आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!