news
रहाटणीत नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची धडक कारवाई! गजानन नगरमधील ‘डेथ ट्रॅप’ ठरणारी ड्रेनेज समस्या २४ तासांत केली गुलपिंपरी-चिंचवडमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ५ कोटींची फसवणूक करणारे आहेरकर कुटुंब नेवासामधून अटक! आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाईजागतिक बाजारात सोने गडगडले! स्पॉट गोल्ड ४,१६९ डॉलरवर; अमेरिकन व्याजदर आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार चिंतेतभारतातील म्युझिक इंडस्ट्रीला केंद्र सरकारचे मोठे गिफ्ट; ‘PPL India’ ला मिळाली अधिकृत कॉपीराईट सोसायटी म्हणून मान्यता!मोरवाडीत पिंपरी-चिंचवड भाजपचा भव्य नियुक्ती सोहळा; भुजबळ, नेमाने, भालेराव, मोरे आणि शिर्के यांच्यावर नव्या आघाड्यांची जबाबदारी!
Home अमरावती कुंड सर्जापूरमध्ये कलेचा अविष्कार! चंद्रभानजी विद्यालयाचे दोन दिवसीय स्नेहसंमेलन जल्लोषात; मान्यवरांची मांदियाळी

कुंड सर्जापूरमध्ये कलेचा अविष्कार! चंद्रभानजी विद्यालयाचे दोन दिवसीय स्नेहसंमेलन जल्लोषात; मान्यवरांची मांदियाळी

विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी वेधले लक्ष; श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगाेले यांच्या हस्ते उद्घाटन. (© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव-दिलीपबाबू इंगाेले; चंद्रभानजी विद्यालयात स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न


अमरावती, दि . १७ जानेवारी २०२६, मॅक्स मंथन डेली न्यूज :

“लहान वयात विद्यार्थ्यांच्या आंतरिक सुप्त गुणांना वाव देण्यासाठी स्नेहसंमेलन हे एक प्रभावी व्यासपीठ आहे. शालेय जीवनातील अशा कार्यक्रमांमधूनच विद्यार्थ्यांची खरी प्रतिभा पुढे येत असते,” असे प्रतिपादन श्रीराम मंदिर ट्रस्ट, कुंड सर्जापूरचे अध्यक्ष तथा श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगाेले यांनी केले.

अमरावती जवळील कुंड सर्जापूर येथील चंद्रभानजी विद्यालयाचे दोन दिवसीय स्नेहसंमेलन नुकतेच उत्साहात पार पडले. या स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन प्रभू श्रीराम, शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख, दानदाते स्व. चंद्रभानजी मानकर व विद्यालयाचे संस्थापक स्व. रावसाहेब इंगोले यांच्या प्रतिमा पूजनाने झाले. मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीराम मंदिर ट्रस्टचे सदस्य प्राचार्य गजाननराव इंगोले, रमेशपंत बहाळे, वसंतराव मानकर, सुधीरराव कुकडे, संजयराव मानकर, चंद्रशेखरराव मानकर, अशोकराव मानकर उपस्थित होते. तसेच सत्कारमूर्ती अक्षय इंगोले, माजी मुख्याध्यापक आर. एस. गावंडे, रमेशपंत किटूकले व मुख्याध्यापक एन. टी. चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

या सोहळ्यात डॉ. पंजाबराव देशमुख बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल अक्षय दिलीप इंगोले आणि महाराष्ट्र शासनाचा ‘क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्राप्त झाल्याबद्दल क्रीडा शिक्षक शरद वसंतराव गढीकर यांचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

दोन दिवसीय स्नेहसंमेलनात क्रीडा स्पर्धा, रांगोळी, हस्तकला, चित्रकला, गणित मॉडेल आणि प्रश्नमंजुषा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सांस्कृतिक कार्यक्रमात सन २०२५-२६ मधील राष्ट्रीय स्तरावरील ३ आणि राज्यस्तरावरील ६४ खेळाडूंचा गौरव करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अरुणा वाडेकर उपस्थित होत्या.

मुख्याध्यापक एन. टी. चव्हाण यांच्या मार्गदर्शनात स्नेहसंमेलन प्रभारी एस. पी. लाजूरकर, व्ही. के. राठोड, के. एस. लाजूकर, ए. पी. मांगे, आर. एस. मानकर, ए. व्ही. राजगुरे, सी. ए. शेंडे, आर. आर. मडावी व विद्यार्थी प्रतिनिधींनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन आर. एस. मानकर यांनी केले तर आभार एस. पी. लाजूरकर यांनी मानले.

या सोहळ्याला कुंड सर्जापूरचे सरपंच निलेश मानकर, वनारसीच्या सरपंच ज्योत्स्ना मोहोड, हातुर्णाचे सरपंच भरतरीनाथ गौरकर आणि भूषण वाणे यांच्यासह ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!