news
निष्ठा आणि त्यागाचे मिळणार फळ? माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासाठी समर्थकांकडून फिल्डिंग; भोसरीसह शहराच्या राजकारणात चर्चांना उधाणबिरदवडी हत्याकांड: आईशी असलेल्या संबंधांच्या रागातून मुलानेच रचला खुनाचा कट; मित्राच्या मदतीने जंगलात नेऊन केला अंतमहापालिकेच्या लेकींनी मुंबई गाजवली! टाकाऊ वस्तूंमधून साकारलेल्या कलेला महाराष्ट्रातून पहिला बहुमानपार्थ पवार की जय पवार? राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी पवार कुटुंबातील तरुण नेतृत्वाचे नाव चर्चेत; राष्ट्रवादीच्या गोटातून मोठी अपडेटमॅरेथॉन आढावा बैठक आणि प्रत्यक्ष पाहणी! विकासकामातील दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही; लोकप्रतिनिधींच्या आक्रमक पवित्र्याने अधिकाऱ्यांची धावपळ
Home पुणे पुण्यात आरोग्याची नवी पहाट! औंधमध्ये ‘ANSSI Wellness’ सेंटर कार्यान्वित; विना औषध, विना इंजेक्शन मणक्यांचे उपचार शक्य

पुण्यात आरोग्याची नवी पहाट! औंधमध्ये ‘ANSSI Wellness’ सेंटर कार्यान्वित; विना औषध, विना इंजेक्शन मणक्यांचे उपचार शक्य

माजी आयएएस अधिकारी केशव कांबळे यांच्या हस्ते उद्घाटन; ९० टक्के यशस्वी दरासह मणक्यांच्या व्याधीतून मिळणार कायमची मुक्ती. (© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

मणक्यांच्या आजारांवर आता शस्त्रक्रियेशिवाय उपचार; औंधमध्ये ‘ए एन एस एस आय वेलनेस’ केंद्राचे दिमाखदार उद्घाटन


पुणे : आजच्या धावपळीच्या आणि बदलत्या जीवनशैलीमुळे मानदुखी, कंबरदुखी, सायटिका आणि स्लिप डिस्क यांसारख्या मणक्यांच्या आजारांनी त्रस्त रुग्णांची संख्या मोठी आहे. या आजारांवर अनेकदा शस्त्रक्रिया हाच अंतिम पर्याय सुचवला जातो. मात्र, आता कोणतीही औषधे, इंजेक्शन किंवा शस्त्रक्रिया न करता आधुनिक अमेरिकन तंत्रज्ञानाद्वारे मणक्यांच्या आजारांवर प्रभावी उपचार मिळणे शक्य झाले आहे. औंध येथे ‘ए एन एस एस आय वेलनेस’ (ANSSI Wellness) सेंटरचे नुकतेच भव्य उद्घाटन करण्यात आले, अशी माहिती संस्थेचे संस्थापक दिनेश दळवी यांनी दिली.

या उद्घाटन प्रसंगी माजी आयएएस अधिकारी केशव कांबळे, सुमेध स्थूल, उपचार तज्ज्ञ डॉ. विद्या झिलपे, संतोष संखद, उद्योजक भोसले, आर. बी. सूर्यवंशी, अ‍ॅड. ढोकणे, डॉ. अमूप गजविये, व्यवस्थापक मंगेश कदम, इंजि. इक्बाल पीरझादे, डॉ. रमेश चौधरी, डॉ. अनुराधा कदम, डॉ. सपना, डाॅ. आकांक्षा, यश मोरे, सोहन कांबले, डॉ. अनुराग, जमुना आणि आकांक्षा मल्लाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

स्वतःच्या अनुभवातून संकल्पना साकारली – दिनेश दळवी

संस्थापक दिनेश दळवी यांनी आपला अनुभव सांगताना नमूद केले की, “काही वर्षांपूर्वी मी स्वतः मणक्यांच्या तीव्र आजाराने त्रस्त होतो. भारतात अनेक उपचार करूनही फरक पडला नाही, मात्र अमेरिकेतील सुप्रसिद्ध स्पाईन तज्ज्ञ डॉ. जोसेफ कॅमराटा यांच्याकडे घेतलेल्या ‘स्पायनल डी-कंप्रेशन’ उपचारामुळे मी पूर्णपणे बरा झालो. हाच प्रभावी उपचार भारतीय रुग्णांना मिळावा या उद्देशाने हे सेंटर सुरू करण्यात आले आहे.” सध्या ही केंद्रे मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, हैदराबाद, दुबईसह अनेक शहरांत कार्यरत आहेत.

शस्त्रक्रिया टाळणे आता शक्य

माजी आयएएस अधिकारी केशव कांबळे म्हणाले की, “शस्त्रक्रियेसाठी येणारा मोठा खर्च आणि त्यातील जोखीम पाहता, ही उपचार पद्धत सर्वसामान्यांसाठी वरदान ठरेल.” हे उपचार अमेरिकन पेटंट असलेल्या ‘नॉन-सर्जिकल स्पायनल डी-कंप्रेशन’ तंत्रज्ञानावर आधारित आहेत. हार्वर्ड आणि मेयो क्लिनिकच्या शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या या पद्धतीमुळे आतापर्यंत ८,००० हून अधिक रुग्णांच्या शस्त्रक्रिया टाळण्यात यश आले आहे.

ठळक वैशिष्ट्ये:

  • क्षेत्रफळ: ३,००० चौरस फूट प्रशस्त जागा.

  • तज्ज्ञ डॉक्टर: ५० पेक्षा जास्त अनुभवी स्पाईन तज्ज्ञांची टीम.

  • यशस्वी दर: ९० टक्क्यांहून अधिक यश दरासह आजीवन आराम देण्याचा दावा.

  • विशेष आकर्षण: यावेळी डॉ. विद्या झिलपे यांच्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘Spine Care’ पुस्तकाचे वितरणही करण्यात आले.

पुण्यात गेल्या चार वर्षांत सुमारे २,५०० रुग्णांनी या तंत्रज्ञानाचा लाभ घेतला असून, औंध येथील नवीन केंद्रामुळे पश्चिम पुण्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!