news
“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ“७ मार्चच्या जबरी चोरीचा छडा, सोन्याचे मिनी गंठण जप्त!” हिंजवडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; फरार साथीदार विशाल काळेचा शोध सुरू, परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या टोळीला चाप
Home पिंपरी चिंचवड सायकलिंगच्या जागतिक महाकुंभाने शहर दुमदुमले! ‘बजाज पुणे ग्रँड टूर’मध्ये मॉडगवे लोकेची सरशी; हशवीर सिंग ठरला ‘बेस्ट इंडियन रायडर’

सायकलिंगच्या जागतिक महाकुंभाने शहर दुमदुमले! ‘बजाज पुणे ग्रँड टूर’मध्ये मॉडगवे लोकेची सरशी; हशवीर सिंग ठरला ‘बेस्ट इंडियन रायडर’

खासदार मेधा कुलकर्णी व आमदार शंकर जगतापांच्या हस्ते विजेत्यांचा सन्मान; लक्ष्मी चौक ते आकुर्डी मार्गावर नागरिकांची अलोट गर्दी, २३ जानेवारीला सायकलपटू पुन्हा पिंपरी-चिंचवडमध्ये धडकणार. (© २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

आंतरराष्ट्रीय सायकलपटूंच्या वेगाला पिंपरी-चिंचवडकरांची दाद; ‘पुणे ग्रँड टूर’चे जल्लोषात स्वागत, मॉडगवे लोके ठरला विजेता


पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २१ जानेवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज

पिंपरी : ढोल-ताशांचा निनाद, टाळ्यांचा गजर आणि ‘चीअर अप’च्या घोषणांनी आज पिंपरी-चिंचवड शहर दुमदुमले. ‘बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या पहिल्या टप्प्याचे पिंपरी-चिंचवडकरांनी अभूतपूर्व उत्साहात स्वागत केले. लक्ष्मी चौक ते आकुर्डी या मार्गावर सायकलपटूंच्या वेगाचा थरार पाहण्यासाठी नागरिकांनी दुतर्फा हजारोंच्या संख्येने गर्दी केली होती.

हिंजवडी येथील टी.सी.एस. सर्कल येथून सुरू झालेल्या या ९१.८ किलोमीटरच्या पहिल्या टप्प्याचा समारोप आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय इन्स्टिट्यूटमध्ये झाला. या ठिकाणी विजेत्या खेळाडूंचा सन्मान खासदार मेधा कुलकर्णी, आमदार उमाताई खापरे, अमित गोरखे, शंकर जगताप, आयुक्त श्रावण हर्डीकर आणि पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. जितेंद्र डुडी व महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात आंतरराष्ट्रीय सायकलपटूंनी आपल्या कौशल्याची चुणूक दाखवली:

  • प्रथम क्रमांक: मॉडगवे लोके (Modgway Loke)

  • द्वितीय क्रमांक: सँटी आर्ने (Santy Arne)

  • तृतीय क्रमांक: जॉर्जिओस (Georgios)

  • बेस्ट इंडियन रायडर: हशवीर सिंग (Hashveer Singh)

  • किंग ऑफ माऊंटन: रायलेआनू क्रिस्टियन (Raileanu Cristian)

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात जय्यत तयारी करण्यात आली होती. स्पर्धेच्या मार्गावर फुलांची आकर्षक सजावट आणि भिंतींवर क्रीडा संस्कृती दर्शवणारी भित्तिचित्रे साकारण्यात आली होती. ड्रोन आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून सुरक्षेवर बारीक लक्ष ठेवण्यात आले होते, तर ठिकठिकाणी रुग्णवाहिका व तांत्रिक मदत पथके सज्ज ठेवण्यात आली होती.

सायकलिंग प्रेमींसाठी आनंदाची बातमी म्हणजे, २३ जानेवारी २०२६ रोजी या स्पर्धेचा पुढचा महत्त्वाचा टप्पा पुन्हा एकदा पिंपरी-चिंचवडमधून जाणार आहे. बालेवाडी स्टेडियम येथून दुपारी १.३० वाजता सुरू होणारी ही स्पर्धा रावेत, आकुर्डी, भक्ती-शक्ती चौक, भोसरी, स्पाईन रोड आणि एम्पायर इस्टेट मार्गे पुण्याकडे प्रस्थान करेल. या दिवशीही आंतरराष्ट्रीय सायकलपटूंचा वेग जवळून पाहण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!