news
रहाटणीत नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची धडक कारवाई! गजानन नगरमधील ‘डेथ ट्रॅप’ ठरणारी ड्रेनेज समस्या २४ तासांत केली गुलपिंपरी-चिंचवडमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ५ कोटींची फसवणूक करणारे आहेरकर कुटुंब नेवासामधून अटक! आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाईजागतिक बाजारात सोने गडगडले! स्पॉट गोल्ड ४,१६९ डॉलरवर; अमेरिकन व्याजदर आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार चिंतेतभारतातील म्युझिक इंडस्ट्रीला केंद्र सरकारचे मोठे गिफ्ट; ‘PPL India’ ला मिळाली अधिकृत कॉपीराईट सोसायटी म्हणून मान्यता!मोरवाडीत पिंपरी-चिंचवड भाजपचा भव्य नियुक्ती सोहळा; भुजबळ, नेमाने, भालेराव, मोरे आणि शिर्के यांच्यावर नव्या आघाड्यांची जबाबदारी!
Home पिंपरी चिंचवड मालमत्ता करासाठी पालिकेचा ‘धाक’! थकबाकीदारांची नावे होणार सार्वजनिक; जप्ती टाळण्यासाठी त्वरित कर भरण्याचे आवाहन

मालमत्ता करासाठी पालिकेचा ‘धाक’! थकबाकीदारांची नावे होणार सार्वजनिक; जप्ती टाळण्यासाठी त्वरित कर भरण्याचे आवाहन

अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांचा कडक इशारा; १८ विभागीय कार्यालयांची पथके शहरभर सक्रिय, बिगरनिवासी मालमत्तांवर थेट टाच. (© २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

थकबाकीदारांनो सावधान! पिंपरी-चिंचवड पालिकेची जप्ती मोहीम तीव्र; नळ कनेक्शन कापण्यासही सुरुवात


पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २२ जानेवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने मालमत्ता कर थकबाकीदारांविरुद्ध आता ‘आरपार’ची लढाई सुरू केली आहे. वारंवार नोटिसा देऊनही कराचा भरणा न करणाऱ्या मालमत्ताधारकांवर २१ जानेवारीपासून शहरभर व्यापक जप्ती मोहीम हाती घेण्यात आली आहे. या कारवाईमध्ये निवासी मालमत्तांचे नळ कनेक्शन खंडित करणे आणि बिगरनिवासी मालमत्तांची थेट जप्ती करणे, अशा कठोर पावलांचा समावेश आहे.

महानगरपालिकेने १८ विभागीय कार्यालयांच्या माध्यमातून स्वतंत्र पथके तयार केली आहेत. मोहिमेच्या सुरुवातीलाच प्रशासनाने आपला इरादा स्पष्ट केला असून, आतापर्यंत शहरातील ३५ मालमत्तांची जप्ती करण्यात आली आहे. तसेच १३३ निवासी मालमत्ताधारकांनी कर न भरल्याने त्यांचे नळ कनेक्शन खंडित करण्यात आले आहे.

ज्या थकबाकीदारांनी अद्याप कर भरलेला नाही, त्यांची नावे आता सार्वजनिकरीत्या प्रसिद्ध केली जाणार आहेत. ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर कोणत्याही तक्रारीची दखल घेतली जाणार नाही, असे कर आकारणी व कर संकलन विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे “जप्तीची कटू कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी तातडीने कराचा भरणा करावा,” असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी स्पष्ट केले की, “मालमत्ता कर हा शहराच्या विकासाचा मुख्य स्रोत आहे. पाणीपुरवठा, स्वच्छता आणि शिक्षण यांसारख्या सेवा सक्षम ठेवण्यासाठी महसूल आवश्यक आहे, त्यामुळे थकबाकीदारांवर कोणतीही सूट न देता कारवाई केली जाईल.”

उपायुक्त पंकज पाटील यांनी माहिती दिली की, “प्रत्येक विभागीय कार्यालयामार्फत रोजचा आढावा घेतला जात असून, क्षेत्रनिहाय नियोजनबद्ध कारवाई सुरू आहे. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने कर भरून महापालिकेला सहकार्य करावे.”


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!