news
रहाटणीत नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची धडक कारवाई! गजानन नगरमधील ‘डेथ ट्रॅप’ ठरणारी ड्रेनेज समस्या २४ तासांत केली गुलपिंपरी-चिंचवडमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ५ कोटींची फसवणूक करणारे आहेरकर कुटुंब नेवासामधून अटक! आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाईजागतिक बाजारात सोने गडगडले! स्पॉट गोल्ड ४,१६९ डॉलरवर; अमेरिकन व्याजदर आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार चिंतेतभारतातील म्युझिक इंडस्ट्रीला केंद्र सरकारचे मोठे गिफ्ट; ‘PPL India’ ला मिळाली अधिकृत कॉपीराईट सोसायटी म्हणून मान्यता!मोरवाडीत पिंपरी-चिंचवड भाजपचा भव्य नियुक्ती सोहळा; भुजबळ, नेमाने, भालेराव, मोरे आणि शिर्के यांच्यावर नव्या आघाड्यांची जबाबदारी!
Home पिंपरी चिंचवड “निष्ठावंतांचा सन्मान करा!” शीतल शिंदे यांच्या भूमिकेमुळे भाजपमध्ये खळबळ; ओबीसी समाजावर अन्याय झाल्याचा समर्थकांचा सूर

“निष्ठावंतांचा सन्मान करा!” शीतल शिंदे यांच्या भूमिकेमुळे भाजपमध्ये खळबळ; ओबीसी समाजावर अन्याय झाल्याचा समर्थकांचा सूर

महापौरपदाऐवजी उपमहापौरपदाचे 'गाजर' दाखवल्याचा आरोप; गटनेते निवडीनंतर उपमहापौर पदावरून पक्षात अंतर्गत संघर्ष उघड. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘गावकी-भाऊकी’च्या राजकारणाचा विजय; निष्ठावान नगरसेवक शीतल शिंदे यांनी नाकारले उपमहापौरपद


पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या राजकारणात आज एक मोठी खळबळजनक घटना घडली आहे. भारतीय जनता पक्षाचे सलग तीनवेळा ‘कमळ’ चिन्हावर निवडून आलेले निष्ठावान नगरसेवक शीतल उर्फ विजय शिंदे यांनी पक्षाने दिलेले उपमहापौरपद नाकारत अर्ज भरण्यास स्पष्ट नकार दिला आहे. शहरात ‘गावकी-भाऊकी’च्या राजकारणाचा शेवटी विजय झाला असल्याची चर्चा या निमित्ताने रंगली आहे.

शीतल शिंदे हे भाजपचे शहरातील एकमेव नगरसेवक आहेत जे सलग तीन पंचवार्षिक केवळ भाजपच्या चिन्हावर निवडून आले आहेत. त्यांच्या ज्येष्ठतेचा (Seniority) विचार करता, त्यांना महापौरपद मिळणे अपेक्षित होते. मात्र, ऐनवेळी त्यांना विश्वासात न घेता उपमहापौरपदाचे ‘गाजर’ दाखवण्यात आल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे.

शीतल शिंदे हे गुरव समाजाचे असून, अल्पसंख्याक ओबीसी आणि बारा बलुतेदार समाजाचे प्रतिनिधित्व करतात. पक्षाशी इतकी वर्षे एकनिष्ठ राहूनही जर अशा पद्धतीने डावलले जात असेल, तर पद न घेतलेलेच चांगले, अशी भूमिका शिंदे यांनी घेतली. “पक्षाशी एकनिष्ठ राहून जर पक्ष अशा पद्धतीने वागत असेल, तर ते पद नाकारणेच योग्य,” असे बोलून त्यांनी अर्ज भरण्याच्या ठिकाणावरून काढता पाय घेतला.

भाजप गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड झाल्यानंतर आता उपमहापौर पदावरून पक्षात अंतर्गत नाराजी उघड झाली आहे. निष्ठावान आणि ज्येष्ठ नगरसेवकाला डावलून निर्णय घेतल्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही संतापाचे वातावरण आहे. या घडामोडीमुळे महापालिकेतील भाजपच्या अंतर्गत राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शहरातील मूळ रहिवासी आणि गावकी-भाऊकीच्या राजकारणामुळे एका निष्ठावान नेतृत्वावर अन्याय झाल्याची भावना सध्या राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!