news
“येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिली गुन्ह्यांची कबुली!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; महाळुंगे आणि तळेगाव एम.आय.डी.सी. परिसरातील चोरीचे धागेदोरे उघड“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवड भाजपमध्ये ‘हायड्रामा’! उपमहापौर पदासाठी शर्मिला बाबर यांची अनपेक्षित एन्ट्री; ज्येष्ठतेचा अपमान झाल्याची शीतल शिंदेंची भावना

पिंपरी-चिंचवड भाजपमध्ये ‘हायड्रामा’! उपमहापौर पदासाठी शर्मिला बाबर यांची अनपेक्षित एन्ट्री; ज्येष्ठतेचा अपमान झाल्याची शीतल शिंदेंची भावना

सत्ता येताच भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर; निष्ठावान शीतल शिंदे यांचा सभात्याग, तर बापू काटेंच्या अनुपस्थितीने राजकीय वर्तुळात खळबळ. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

महापौर अर्ज भरताना भाजप शहराध्यक्ष बापू काटे ‘गायब’; शीतल शिंदेंचाही नकार, शर्मिला बाबर यांचा उपमहापौरपदासाठी अर्ज


पिंपरी प्रतिनिधी आकाश कांबळे, २ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाने एकहाती सत्ता मिळवली असली, तरी महापौर आणि उपमहापौर पदाचे उमेदवारी अर्ज भरताना भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. महापौर पदासाठी रवी लांडगे यांचा अर्ज भरताना शहराध्यक्ष शत्रुघ्न उर्फ बापू काटे यांची अनुपस्थिती आणि ज्येष्ठ नगरसेवक शीतल शिंदे यांनी उपमहापौर पद नाकारल्याने महापालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

भाजपच्या विजयात महत्त्वाचा वाटा असलेले आणि दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे शहराध्यक्ष बापू काटे या महत्त्वपूर्ण प्रसंगी अनुपस्थित राहिले. सत्तेच्या केंद्रस्थानी असलेल्या शहराध्यक्षांच्या अनुपस्थितीमध्येच महापौर व उपमहापौर पदाचे अर्ज दाखल करण्यात आल्याने भाजपमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र स्पष्ट झाले असून चर्चेला उधाण आले आहे.

सलग तीनवेळा भाजपच्या चिन्हावर निवडून आलेले निष्ठावान नगरसेवक शीतल उर्फ विजय शिंदे यांनी उपमहापौर पदाचा अर्ज भरण्यास नकार दिला आणि ते सभागृह सोडून निघून गेले. ज्येष्ठतेचा विचार करून महापौर पद मिळावे अशी त्यांची अपेक्षा होती, मात्र उपमहापौर पद देण्यात आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. या नाट्यमय घडामोडीनंतर, भाजपकडून उपमहापौर पदासाठी आता शर्मिला राजू बाबर यांचा नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आला आहे.

शहराध्यक्षांच्या अनुपस्थितीत चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप आणि विधान परिषदेच्या आमदार उमाताई खापरे यांनीच अर्जाच्या प्रक्रियेत पुढाकार घेतल्याचे पाहायला मिळाले. यावेळी भोसरीचे आमदार महेश लांडगे, आमदार अमित गोरखे, नवनिर्वाचित गटनेते प्रशांत शितोळे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. नगरसचिव मुकेश कोळप यांनी महापौर पदासाठी रवी लांडगे आणि उपमहापौर पदासाठी शर्मिला बाबर यांचे अर्ज स्वीकारले.

महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी येत्या ६ फेब्रुवारीला विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत अधिकृतपणे ही पदे घोषित केली जातील. मात्र, सत्तेच्या पहिल्याच पायरीवर उफाळून आलेल्या या गटबाजीमुळे आगामी काळात पक्षांतर्गत समीकरणे कशी बदलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!