news
रहाटणीत नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची धडक कारवाई! गजानन नगरमधील ‘डेथ ट्रॅप’ ठरणारी ड्रेनेज समस्या २४ तासांत केली गुलपिंपरी-चिंचवडमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ५ कोटींची फसवणूक करणारे आहेरकर कुटुंब नेवासामधून अटक! आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाईजागतिक बाजारात सोने गडगडले! स्पॉट गोल्ड ४,१६९ डॉलरवर; अमेरिकन व्याजदर आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार चिंतेतभारतातील म्युझिक इंडस्ट्रीला केंद्र सरकारचे मोठे गिफ्ट; ‘PPL India’ ला मिळाली अधिकृत कॉपीराईट सोसायटी म्हणून मान्यता!मोरवाडीत पिंपरी-चिंचवड भाजपचा भव्य नियुक्ती सोहळा; भुजबळ, नेमाने, भालेराव, मोरे आणि शिर्के यांच्यावर नव्या आघाड्यांची जबाबदारी!
Home पिंपरी चिंचवड निष्ठा आणि त्यागाचे मिळणार फळ? माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासाठी समर्थकांकडून फिल्डिंग; भोसरीसह शहराच्या राजकारणात चर्चांना उधाण

निष्ठा आणि त्यागाचे मिळणार फळ? माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासाठी समर्थकांकडून फिल्डिंग; भोसरीसह शहराच्या राजकारणात चर्चांना उधाण

प्रशासकीय कामकाजाचा दांडगा अनुभव आणि अभ्यासू वृत्ती; महापालिकेत राष्ट्रवादीची बाजू भक्कम करण्यासाठी 'अजितदादां'च्या विश्वासू शिलेदाराचे नाव चर्चेत. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

अजित गव्हाणे यांची ‘स्वीकृत नगरसेवक’ म्हणून महापालिकेत एन्ट्री? प्रशासनावर पकड असणाऱ्या ज्येष्ठ नेतृत्वासाठी राष्ट्रवादीकडून हालचाली सुरू


पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, ३ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

 

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या राजकारणात सध्या एका नावाची जोरदार चर्चा सुरू आहे, ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष अजित गव्हाणे. गव्हाणे यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून महापालिकेत संधी दिली जाण्याची शक्यता असून, या चर्चेने पालिकेच्या गोटात मोठे उधाण आले आहे.

अजित गव्हाणे यांची ओळख शहराच्या राजकारणात एक अभ्यासू आणि ज्येष्ठ नगरसेवक म्हणून आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिल्यामुळे महानगरपालिकेच्या तिजोरीवर आणि प्रशासकीय कामकाजावर त्यांची मोठी पकड आहे. सध्याच्या प्रशासकीय राजवटीत महापालिकेत अनुभवी नेतृत्वाची गरज असल्याने, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) गव्हाणे यांच्या अनुभवाचा वापर करण्यासाठी त्यांना ‘स्वीकृत’ म्हणून सभागृहात पाठवण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.

अजित गव्हाणे हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार आणि माजी आमदार विलास लांडे पाटील यांच्या तालमीत तयार झालेले निष्ठावंत कार्यकर्ते मानले जातात. पक्षाच्या पडत्या काळातही त्यांनी शहराध्यक्ष म्हणून संघटना मजबूत ठेवण्यासाठी मोठे कष्ट घेतले. त्यांच्या याच निष्ठेचे फळ म्हणून पक्ष त्यांना ही मोठी जबाबदारी देऊ इच्छित आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अजित गव्हाणे यांनी आमदारकी लढवली होती. त्यावेळी त्यांनी स्वतःच्या नगरसेवक पदाचा दावा सोडून आपल्या एका अत्यंत जवळच्या कार्यकर्त्याला त्या जागी संधी दिली. त्यांच्या या ‘मनाच्या मोठेपणा’ची आणि त्यागाची दखल आता पक्षश्रेष्ठींकडून घेतली जात आहे. एक अभ्यासू वक्ता आणि आक्रमक लोकप्रतिनिधी म्हणून गव्हाणे पुन्हा सभागृहात आल्यास राष्ट्रवादीची बाजू अधिक भक्कम होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये आहे.

भोसरी विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण शहरात अजित गव्हाणे यांचा दांडगा जनसंपर्क आहे. स्वीकृत नगरसेवक पदासाठी त्यांच्या नावावर अधिकृत मोहोर कधी उमटणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. गव्हाणे यांची महापालिकेत पुनरावृत्ती झाल्यास सत्ताधारी आणि प्रशासन या दोघांवरही लोकप्रतिनिधींचा वचक निर्माण होण्यास मदत होईल.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!