news
Home पिंपरी चिंचवड वाहनचालकांनो लक्ष द्या! इंद्रायणीनगर भागात वाहतुकीत फेरबदल; पोलीस भरतीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी

वाहनचालकांनो लक्ष द्या! इंद्रायणीनगर भागात वाहतुकीत फेरबदल; पोलीस भरतीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी

हजारो उमेदवारांच्या उपस्थितीमुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस सज्ज; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे प्रशासनाचे आवाहन. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

भोसरीतील ‘या’ रस्त्यांवर प्रवेशबंदी! पोलीस भरतीमुळे वाहतुकीत मोठे बदल; ११ फेब्रुवारीपासून लागू होणार नवीन नियमावली


पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, ९ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील रिक्त पदांसाठीची पोलीस भरती प्रक्रिया सन २०२५-२६ सुरू होत आहे. या भरती अंतर्गत उमेदवारांची शारीरिक मोजमाप आणि मैदानी चाचणी भोसरी येथील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, इंद्रायणीनगर येथे आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर परिसरात होणारी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस उप-आयुक्त (वाहतूक) विवेक पाटील यांनी तात्पुरत्या स्वरूपात वाहतूक बदल अधिसूचना निर्गमित केली आहे.

हे बदल दिनांक ११/०२/२०२६ ते २६/०२/२०२६ या कालावधीत लागू राहतील. चिखली वाहतूक विभागांतर्गत खालीलप्रमाणे निर्बंध लादण्यात आले आहेत:

  • प्रवेशबंदी: भोसरी इंद्रायणीनगर महादेव मंदिर ते श्री स्वामी समर्थ सी.बी.एस.ई. स्कूल गेट नं. २ या दरम्यानच्या रस्त्यावरून सर्व प्रकारच्या वाहनांना येण्या-जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

१. सहार चौकाकडून येणाऱ्यांसाठी: भोसरी तिरुपती (सहारा) चौकाकडून इंद्रायणीनगर स्वीट कॉर्नरकडे जाणारी वाहतूक श्री समर्थ स्कूल गेट नं. २ येथून उजवीकडे वळवून, पोलीस वसाहत मिनी मार्केट मार्गे रामकृष्ण मोरे प्रवेशद्वारातून बाहेर पडून इच्छित स्थळी जाईल.

२. इंद्रायणीनगरकडून जाणाऱ्यांसाठी: स्वीट कॉर्नर चौकाकडून सहारा चौकाकडे जाणारी वाहतूक महादेव मंदिर येथून डावीकडे वळवून, रामकृष्ण मोरे प्रवेशद्वारातून मिनी मार्केटच्या पुढे राकेश स्वीट मार्ट मार्गे मार्गस्थ होईल.

हे आदेश १० फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १२ वाजेपासून ते २६ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहतील. मात्र, पोलीस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका यांसारख्या अत्यावश्यक सेवांमधील वाहनांना यातून सवलत देण्यात आली आहे. नागरिकांनी सहकार्य करावे आणि पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी केले आहे.

भोसरी परिसरात होणाऱ्या या भरती प्रक्रियेसाठी हजारो उमेदवार येण्याची शक्यता असल्याने, चिखली वाहतूक विभागाने बॅरिकेडिंग आणि अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!