news
“अजितदादांना खरी श्रद्धांजली द्यायची असेल तर ‘कडक’ आयुक्त द्या!” प्रशासकीय भ्रष्टाचारावरून मारुती भापकरांचा हल्लाबोल“औषधे बाहेरून तर आणावी लागत नाहीत ना?” वॉर्डात जाऊन महापौरांनी केली विचारपूस; वायसीएमच्या आरोग्य सुविधा सक्षम करण्याचे निर्देशचऱ्होली बुद्रुकमध्ये वाहतूक निर्बंध लागू! वाघेश्वर चौक परिसरातील वाहनांची ये-जा थांबवली; भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाचा मोठा निर्णयउर्ध्व वर्धा धरणातून ३१ हजार हेक्टरला मिळणार पाणी! कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय; पिण्याच्या पाण्यासाठी ६१ दलघमी राखीव‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या बलिदानाचा जागर! पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून विशेष समन्वय बैठकीचे आयोजन
Home पिंपरी चिंचवड “अजितदादांना खरी श्रद्धांजली द्यायची असेल तर ‘कडक’ आयुक्त द्या!” प्रशासकीय भ्रष्टाचारावरून मारुती भापकरांचा हल्लाबोल

“अजितदादांना खरी श्रद्धांजली द्यायची असेल तर ‘कडक’ आयुक्त द्या!” प्रशासकीय भ्रष्टाचारावरून मारुती भापकरांचा हल्लाबोल

सत्ता येताच पदाधिकाऱ्यांच्या 'मस्ती'चा पहिला अंक; कंत्राटासाठी महिला उपायुक्तांच्या केबिनमध्ये घुसून धमकी, मारुती भापकरांचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना खळबळजनक पत्र. (@२०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवडमध्ये सत्ता येताच भाजप पदाधिकाऱ्याची महिला अधिकाऱ्याला धमकी! ‘पोपट हजारे’ प्रकरणाने शहरात खळबळ; श्रीकर परदेशी किंवा तुकाराम मुंडेंना आयुक्त नेमण्याची मारुती भापकरांची मागणी

 


पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले , १४ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता येऊन आठवडाही उलटला नाही, तोच सत्ताधाऱ्यांच्या ‘मस्ती’चा पहिला अंक समोर आला आहे. भाजपचे शहराध्यक्ष पोपट हजारे यांनी एका महिला उपायुक्तांच्या केबिनमध्ये घुसून त्यांना धमकी दिल्याची धक्कादायक घटना घडली असून, यावरून शहराचे ज्येष्ठ समाजसेवक मारुती भापकर यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून प्रशासकीय सुधारांची आग्रही मागणी केली आहे.

मिळालेली माहिती अशी की, शुक्रवारी दि. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी दीडच्या सुमारास भाजपचे शहर उपाध्यक्ष पोपट हजारे यांनी एका महिला उपायुक्तांच्या दालनात प्रवेश केला. त्यांच्या ‘सन राईज फाउंडेशन’ या संस्थेला कंत्राट मिळावे यासाठी त्यांनी “मी सांगतो त्याप्रमाणे अटी व नियम बदला, नाहीतर तुम्हाला बघून घेईन,” अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकाराने घाबरलेल्या महिला उपायुक्तांनी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली असून, हजारे यांच्यावर अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या घटनेचा निषेध करत मारुती भापकर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात पालिकेतील भ्रष्टाचाराचे वाभाडे काढले आहेत. पत्रातील मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे:

  • वचनाला तिलांजली: भाजपने २०१७ मध्ये ‘भय व भ्रष्टाचारमुक्त’ शहराचे वचन दिले होते, मात्र सत्ता येताच पदाधिकारी अधिकाऱ्यांना धमकावत आहेत.

  • प्रशासकीय दरोडे: २०१९ ते २०२६ या प्रशासकीय राजवटीत आयुक्त शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी करदात्यांच्या तिजोरीवर दरोडे घातल्याचा गंभीर आरोप भापकर यांनी केला आहे.

  • नियोजित घोटाळे: विकास आराखडा (DP), स्मार्ट सिटी, टीडीआर, जॅकवेल खरेदी, सिमेंट रोड आणि मोशी रुग्णालय उभारणीत प्रचंड गैरव्यवहार झाल्याचा दावा पत्रात करण्यात आला आहे.

स्व. अजितदादा पवार यांचे स्वप्न ‘सुनियोजित व दर्जेदार विकास’ हेच होते. त्यांना खरी श्रद्धांजली वाहायची असेल, तर पिंपरी-चिंचवडला डॉ. श्रीकर परदेशी किंवा तुकाराम मुंडे यांच्यासारखा कडक शिस्तीचा आयएएस अधिकारी आयुक्त म्हणून नियुक्त करावा, अशी मागणी भापकरांनी केली आहे. सध्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे मेट्रोचाही अतिरिक्त पदभार असल्याने त्यांना शहराकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नसल्याचे त्यांनी नमूद केले.

भाजपचे ८४ नगरसेवक निवडून येऊन बहुमत मिळाले असले, तरी पदाधिकाऱ्यांच्या अशा वर्तणुकीमुळे महापालिका वर्तुळात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता राज्य सरकार यावर काय पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!