news
रहाटणीत नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची धडक कारवाई! गजानन नगरमधील ‘डेथ ट्रॅप’ ठरणारी ड्रेनेज समस्या २४ तासांत केली गुलपिंपरी-चिंचवडमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ५ कोटींची फसवणूक करणारे आहेरकर कुटुंब नेवासामधून अटक! आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाईजागतिक बाजारात सोने गडगडले! स्पॉट गोल्ड ४,१६९ डॉलरवर; अमेरिकन व्याजदर आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार चिंतेतभारतातील म्युझिक इंडस्ट्रीला केंद्र सरकारचे मोठे गिफ्ट; ‘PPL India’ ला मिळाली अधिकृत कॉपीराईट सोसायटी म्हणून मान्यता!मोरवाडीत पिंपरी-चिंचवड भाजपचा भव्य नियुक्ती सोहळा; भुजबळ, नेमाने, भालेराव, मोरे आणि शिर्के यांच्यावर नव्या आघाड्यांची जबाबदारी!
Home पिंपरी चिंचवड “औषधे बाहेरून तर आणावी लागत नाहीत ना?” वॉर्डात जाऊन महापौरांनी केली विचारपूस; वायसीएमच्या आरोग्य सुविधा सक्षम करण्याचे निर्देश

“औषधे बाहेरून तर आणावी लागत नाहीत ना?” वॉर्डात जाऊन महापौरांनी केली विचारपूस; वायसीएमच्या आरोग्य सुविधा सक्षम करण्याचे निर्देश

अधिष्ठाता आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची घेतली झाडाझडती; सामान्यांना वेगवान उपचार मिळवून देण्यासाठी महापौर रवी लांडगे यांचा 'ॲक्शन मोड'. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा! महापौर रवी लांडगे यांच्याकडून ‘वायसीएम’ची अचानक पाहणी; रुग्णांशी थेट संवाद साधून जाणून घेतल्या अडीअडचणी


पिंपरी प्रतिनिधी आकाश कांबळे, १४ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर रवी लांडगे यांनी आज शहरातील सर्वात मोठे रुग्णालय असलेल्या यशवंतराव चव्हाण स्मृती (YCM) रुग्णालयाला अचानक भेट देऊन तेथील आरोग्य सुविधांचा सविस्तर आढावा घेतला. “नागरिकांसाठी आरोग्यसेवा सर्वोच्च आहे,” असे सांगत महापौरांनी रुग्णालयातील स्वच्छतेपासून ते औषध उपलब्धतेपर्यंत सर्व विभागांची बारकाईने पाहणी केली.

महापौरांनी आपत्कालीन विभाग (Emergency), आयसीयू (ICU), जनरल व स्पेशालिटी वॉर्ड, शस्त्रक्रिया विभाग, प्रयोगशाळा आणि रेडिओलॉजी विभागांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी उपस्थित डॉक्टर आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधून उपकरणांची स्थिती आणि दैनंदिन कामकाजातील आव्हाने समजून घेतली. विशेषतः वैद्यकीय शिक्षणाशी निगडित विभागांना भेट देऊन त्यांनी विद्यार्थी-डॉक्टरांच्या प्रशिक्षण प्रक्रियेचीही माहिती घेतली.

केवळ अधिकाऱ्यांशी चर्चा न करता, महापौर रवी लांडगे यांनी प्रत्यक्ष वॉर्डांमध्ये जाऊन उपचार घेणाऱ्या रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची भेट घेतली. “वेळेवर उपचार मिळतात का?”, “औषधे बाहेरून तर आणावी लागत नाहीत ना?”, अशा शब्दांत त्यांनी विचारपूस केली. अनेक रुग्णांनी रुग्णालय प्रशासनाच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले, तर काहींनी सुचवलेल्या सुधारणांची महापौरांनी तातडीने नोंद घेतली.

या पाहणी दौऱ्यादरम्यान आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, वायसीएमचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, नोडल ऑफिसर डॉ. छाया शिंदे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.


“वायसीएम रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी मोठ्या समर्पणाने काम करत आहेत. नागरिकांना अत्युत्तम, वेगवान आणि विश्वासार्ह आरोग्यसेवा देणे हे आमचे पहिले प्राधान्य आहे. रुग्णालयातील सेवांची गुणवत्ता अधिक उंचावण्यासाठी आणि सुविधा सक्षम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

– रवी लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महापालिका


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!