news
रहाटणीत नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची धडक कारवाई! गजानन नगरमधील ‘डेथ ट्रॅप’ ठरणारी ड्रेनेज समस्या २४ तासांत केली गुलपिंपरी-चिंचवडमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ५ कोटींची फसवणूक करणारे आहेरकर कुटुंब नेवासामधून अटक! आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाईजागतिक बाजारात सोने गडगडले! स्पॉट गोल्ड ४,१६९ डॉलरवर; अमेरिकन व्याजदर आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार चिंतेतभारतातील म्युझिक इंडस्ट्रीला केंद्र सरकारचे मोठे गिफ्ट; ‘PPL India’ ला मिळाली अधिकृत कॉपीराईट सोसायटी म्हणून मान्यता!मोरवाडीत पिंपरी-चिंचवड भाजपचा भव्य नियुक्ती सोहळा; भुजबळ, नेमाने, भालेराव, मोरे आणि शिर्के यांच्यावर नव्या आघाड्यांची जबाबदारी!
Home पिंपरी चिंचवड चऱ्होली बुद्रुकमध्ये वाहतूक निर्बंध लागू! वाघेश्वर चौक परिसरातील वाहनांची ये-जा थांबवली; भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाचा मोठा निर्णय

चऱ्होली बुद्रुकमध्ये वाहतूक निर्बंध लागू! वाघेश्वर चौक परिसरातील वाहनांची ये-जा थांबवली; भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाचा मोठा निर्णय

महाराष्ट्रातून ८० हजार भाविक येण्याची शक्यता; सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत अंतर्गत रस्त्यांवर प्रवेशबंदी, मोटार वाहन कायद्यानुसार वाहतूक शाखेचे नवीन आदेश. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

चऱ्होलीकरांनो सावधान! वाघेश्वर महाराज यात्रेनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; ‘या’ मार्गांवर पाच दिवस असेल प्रवेशबंदी


पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी आकाश कांबळे, १४ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड : मौजे चऱ्होली बुद्रुक (ता. हवेली) येथे श्री वाघेश्वर महाराज उत्सव यात्रेनिमित्त दि. १५ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती, तमाशा आणि बैलगाडा शर्यतींसाठी महाराष्ट्रातून सुमारे ७० ते ८० हजार भाविक येण्याची शक्यता असल्याने, वाघेश्वर चौक परिसरातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.

पोलीस उपायुक्त (वाहतूक शाखा) विवेक पाटील यांनी मोटार वाहन कायद्यानुसार हे तात्पुरते आदेश निर्गमित केले आहेत.

खालील मार्गांवर सर्व प्रकारच्या वाहनांना (अत्यावश्यक सेवा वगळून) प्रवेशबंदी असेल:

अ.क्र. प्रवेश बंदी असलेला मार्ग बंद होण्याचे ठिकाण पर्यायी मार्ग
१. साठेवस्ती ते वाघेश्वर चौक साठे वस्ती चौक कोतवाल वस्ती मार्गे इच्छित स्थळी जावे.
२. शितल फॅब्रिकेशन ते वाघेश्वर चौक शितल फॅब्रिकेशन चौक बुर्डे वस्ती मार्गे इच्छित स्थळी जावे.
३. चऱ्होली स्वीट मार्ट ते वाघेश्वर चौक चऱ्होली स्वीट मार्ट चौक कुंभार वाडा किंवा स्मशानभूमी मार्गे जावे.
४. वाघेश्वर कृषी सेवा केंद्र ते वाघेश्वर चौक वाघेश्वर कृषी सेवा केंद्र स्मशानभूमी किंवा बुर्डे वस्ती मार्गे जावे.

चऱ्होली गावातील अंतर्गत रस्त्यांवर भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याने वाघेश्वर चौकात अपघात टाळण्यासाठी हे निर्बंध लादण्यात आले आहेत. दिघी-आळंदी वाहतूक विभागाच्या वतीने या ठिकाणी बॅरिकेडिंग आणि अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांनी पाच दिवस पर्यायी मार्गांचा अवलंब करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!