news
रहाटणीत नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची धडक कारवाई! गजानन नगरमधील ‘डेथ ट्रॅप’ ठरणारी ड्रेनेज समस्या २४ तासांत केली गुलपिंपरी-चिंचवडमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ५ कोटींची फसवणूक करणारे आहेरकर कुटुंब नेवासामधून अटक! आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाईजागतिक बाजारात सोने गडगडले! स्पॉट गोल्ड ४,१६९ डॉलरवर; अमेरिकन व्याजदर आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार चिंतेतभारतातील म्युझिक इंडस्ट्रीला केंद्र सरकारचे मोठे गिफ्ट; ‘PPL India’ ला मिळाली अधिकृत कॉपीराईट सोसायटी म्हणून मान्यता!मोरवाडीत पिंपरी-चिंचवड भाजपचा भव्य नियुक्ती सोहळा; भुजबळ, नेमाने, भालेराव, मोरे आणि शिर्के यांच्यावर नव्या आघाड्यांची जबाबदारी!
Home पिंपरी चिंचवड महापौरांच्या नियोजनाला ब्राह्मण महासंघाचा सक्रिय पाठिंबा! महापौर दालनात पार पडला सत्कार सोहळा; शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांना सर्वोच्च प्राधान्य

महापौरांच्या नियोजनाला ब्राह्मण महासंघाचा सक्रिय पाठिंबा! महापौर दालनात पार पडला सत्कार सोहळा; शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांना सर्वोच्च प्राधान्य

महासंघाच्या शिष्टमंडळाने दिल्या महापौर रवि लांडगे यांना शुभेच्छा; लोकोपयोगी उपक्रमांसाठी महापालिका आणि सामाजिक संघटनांचा समन्वय साधणार. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

सर्व समाजघटकांना सोबत घेऊन शहराचा सर्वांगीण विकास साधणार! महापौर रवि लांडगे यांचा निर्धार; अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाकडून भव्य सत्कार

 


पिंपरी प्रतिनिधी आकाश कांबळे, १६ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी : “पिंपरी चिंचवड शहराचा विकास हा केवळ सिमेंटच्या इमारतींचा विकास नसेल, तर तो सर्व समाजघटकांच्या सहभागातून आणि समन्वयातून साधलेला शाश्वत विकास असेल,” असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले. शहरामध्ये आगामी काळात शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि सामाजिक सलोख्याला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, शाखा पिंपरी चिंचवड यांच्या वतीने नवनिर्वाचित महापौर रवि लांडगे यांचा महापौर कक्षात सत्कार करण्यात आला. महापौर पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर महापौरांनी शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी आखलेल्या नियोजनाचे महासंघाच्या वतीने स्वागत करण्यात आले.

यावेळी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी महापौरांना शुभेच्छा देतानाच, महापालिकेच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या लोकोपयोगी उपक्रमांना आणि विकास प्रकल्पांना ब्राह्मण महासंघाचा नेहमीच सक्रिय पाठिंबा राहील, अशी भूमिका मांडली. महापौरांनी देखील महासंघाच्या या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

या सत्कार सोहळ्याप्रसंगी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गोविंद भाऊ कुलकर्णी, सरचिटणीस दिलीप कुलकर्णी, प्रदेश उपाध्यक्ष पुष्कराज गोवर्धन, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सचिन कुलकर्णी, कार्याध्यक्ष महेश बारसावडे, राजनजी बुडुख, सुदर्शन जागीरदार, रुचिरा आचार बुरले, सुषमा वैद्य, संगीता कुलकर्णी, संध्या कुलकर्णी, मुकुंद कुलकर्णी, मकरंद वैद्य, प्रवीण कुरबेट, राजेंद्र कुलकर्णी, दुर्वा कुलकर्णी, प्रमोद कुरबेट यांच्यासह महासंघाचे अनेक पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!