news
आगीच्या भक्ष्यस्थानी पडले ॲक्रिलिकचे दुकान; चिंचवडमध्ये सायंकाळी भीषण घटना, व्यापाऱ्याचे मोठे आर्थिक नुकसानलष्करात ‘ऑफिसर’ बनण्याचे स्वप्न करा साकार! आरआयएमसी प्रवेश परीक्षेचे बिगुल वाजले; पुण्यात रंगणार पात्रता चाचणी“मला फोन वापरता येत नाही…” म्हणणाऱ्यांपासून सावध राहा! सायबर गुन्हेगारांचे ‘एआय’ अस्त्र; तुमच्या आवाजाचे आणि चेहऱ्याचे क्लोनिंग करून लुटले जातायत लाखो रुपये“गुरु ग्रंथ साहिबमधील नामदेवरायांची वाणी हा महाराष्ट्राचा अभिमान!” महापौर रवि लांडगे यांनी जागवल्या घुमान दौऱ्याच्या स्मृती५० कलाकार, घोडे आणि उंटांच्या लवाजम्यासह रंगणार ‘शिवगर्जना’! पिंपरी-चिंचवडमध्ये शिवजयंती उत्सवाचा महाकुंभ
Home पिंपरी चिंचवड “महाराष्ट्राची अस्मिता दुखावली, माफी मागाच!” भाजप कार्यकर्त्यांचा पिंपरीत एल्गार; शिवरायांच्या अपमानाप्रकरणी हर्षवर्धन सपकाळांच्या हकालपट्टीसाठी निदर्शने

“महाराष्ट्राची अस्मिता दुखावली, माफी मागाच!” भाजप कार्यकर्त्यांचा पिंपरीत एल्गार; शिवरायांच्या अपमानाप्रकरणी हर्षवर्धन सपकाळांच्या हकालपट्टीसाठी निदर्शने

शहराध्यक्ष बापू काटेंच्या नेतृत्वाखाली भाजप आक्रमक; ऐतिहासिक अज्ञानातून तुलना केल्याचा आरोप, महामानवांची अवहेलना खपवून घेणार नसल्याचा आंदोलकांचा इशारा. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरीत भाजपचे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांविरुद्ध ‘जोडे मारो’ आंदोलन! शिवरायांच्या अपमानावरून बापू काटे आक्रमक; हर्षवर्धन सपकाळ यांच्या हकालपट्टीची मागणी


पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले , १५ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना करून महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान केल्याचा आरोप करत, भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने आज पिंपरी चौकात आक्रमक निदर्शने करण्यात आली. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त केला आणि त्यांच्या तातडीच्या हकालपट्टीची मागणी केली.

शहराध्यक्ष शत्रुघ्न उर्फ बापू काटे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. यावेळी बोलताना भाजप नेत्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. “छत्रपती शिवराय हे आमचे आराध्य दैवत आहेत. त्यांची तुलना धर्मांध टिपू सुलतानशी करणे हे ऐतिहासिक अज्ञान असून, असा अपमान महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही,” असा इशारा यावेळी देण्यात आला. तसेच, संबंधितांनी माफी न मागितल्यास अधिक तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

या आंदोलनात आमदार उमाताई खापरे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस वैशाली खाडये, माजी नगरसेवक राजू दुर्गे, युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश यादव आणि मंडलाध्यक्ष मंगेध धाडगे यांनी आक्रमक भाषणे केली.

या आंदोलनास शहराध्यक्ष शत्रुघ्न उर्फ बापू काटे, आमदार उमाताई खापरे, प्रदेश संयोजक राजेशजी पिल्ले, प्रशांत शितोळे, मोरेश्वर शेडगे, वैशाली खाड्ये, मधुकर बच्चे, नगरसेवक अनुराधा गोरखे, विजय उर्फ शीतल शिंदे, सागर गवळी, राजू मिसाळ, डॉ. सुहास कांबळे, राजाभाऊ मासुळकर, कुणाल लांडगे, राजू दुर्गे, दिनेश यादव, मंगेश धाडगे, मोहन राऊत, अनिता वाळूंजकर, अजित कुलथे, विजय शिनकर, मनोज ब्राह्मणकर, गणेश ढाकणे, देवदत्त लांडे, खंडू कठारे, कैलास सानप, मनीष पंजाबी, युवराज लांडे, सतपाल गोयल, देविदास साबळे, नंदू कदम, दीपक नागरगोजे, युवराज ढोरे, सतीश नागरगोजे, बिभीषण चौधरी, नेताजी शिंदे, हरीश मोरे, दिलीप गडदे, शिवदास हांडे, संतोष टोणगे, हेमंत देवकुळे, सचिन उदागे, रवींद्र सानप, रोहित मोखा, सुमित घाटे, राहुल खाडे, साची दोशी, प्रतीक रामगुडे, साईराज भालेकर, ऋषी भालेकर, गोपाल मंडल, दिनेश काटे, मनोज घोडेकर, अभिजित बागुल, आदम मुलाणी, अजय मोरे, उमेश सांडभोर, गौरव शिरुडे, प्रज्योतसिंग हंस, वैभव लंभाते, वरद अंबिके, सुधीर साळूंखे, मयुर काळभोर, जालिंदर काटे, विजय दळवी, ओमकार पवार, निखिल सहाने आणि संजय परळीकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“भविष्यात स्वतःच्या पक्षाचा नेता असला तरी, जर कोणी महामानवांची अवहेलना केली तर अशाच प्रकारे रस्त्यावर उतरून विरोध केला जाईल,” असा निर्धार कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!