news
Home मुख्यपृष्ठ समाजजागृतीचा प्रेरक प्रवास पुस्तकरूपाने समोर! भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांची प्रमुख उपस्थिती; तरुण पिढीसाठी मार्गदर्शक ठरणार ‘संघर्षयात्रा’

समाजजागृतीचा प्रेरक प्रवास पुस्तकरूपाने समोर! भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांची प्रमुख उपस्थिती; तरुण पिढीसाठी मार्गदर्शक ठरणार ‘संघर्षयात्रा’

गेल्या शतकातील सांस्कृतिक संघर्षाचा ऐतिहासिक आढावा; आरएसएस जिल्हा कार्यवाह नरेंद्रजी पेंडसे यांच्या हस्ते सोहळा संपन्न, पिंपरी-चिंचवडमध्ये वैचारिक जागर. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

‘हिंदू जागरणाच्या १०० वर्षांची संघर्षयात्रा’ ग्रंथाचे पिंपळे सौदागरमध्ये प्रकाशन; राष्ट्रीय अस्मिता आणि समाजजागृतीचा प्रेरणादायी दस्तऐवज


पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २८ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी : गेल्या शंभर वर्षांतील हिंदू समाजजागरणाची वाटचाल, सांस्कृतिक संघर्ष आणि राष्ट्रीय चळवळींचा सविस्तर आढावा घेणाऱ्या “हिंदू जागरणाच्या १०० वर्षांची संघर्षयात्रा” या विशेष ग्रंथाचा प्रकाशन सोहळा पिंपळे सौदागर येथे उत्साहात पार पडला. सांस्कृतिक वार्तापत्र प्रकाशित या पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह नरेंद्रजी पेंडसे यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच सांस्कृतिक वार्तापत्रचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत विक्री अधिकारी निखिल वझे यांचीही उपस्थिती होती.

या ग्रंथामध्ये समाजपरिवर्तन, सांस्कृतिक जतन आणि राष्ट्रीय अस्मिता टिकवण्यासाठी गेल्या शतकात झालेल्या संघर्षाचे ऐतिहासिक संदर्भांसह विवेचन करण्यात आले आहे. विविध आव्हानांमधून उभ्या राहिलेल्या संघटनात्मक कार्याचे दस्तऐवजीकरण या पुस्तकात पाहायला मिळते.

मराठी भाषा दिनानिमित्त शुभेच्छा देताना नरेंद्रजी पेंडसे यांनी मराठी साहित्याच्या समृद्ध परंपरेची ओळख करून दिली. ते म्हणाले की, “संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण रक्षण, स्वबोध आणि नागरी कर्तव्य या पाच प्रमुख विषयांवर समाजात प्रबोधन केले जात आहे. समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी या विषयांवर जनजागृती आवश्यक आहे.”

शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी या ग्रंथाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “हा ग्रंथ केवळ इतिहासाची मांडणी नसून समाजजागृतीचा प्रेरणादायी प्रवास आहे. आजच्या तरुण पिढीने आपल्या सांस्कृतिक परंपरेचा अभ्यास करणे गरजेचे आहे. अशा ग्रंथांमुळे राष्ट्रीय अस्मिता अधिक दृढ होते आणि समाजहितासाठी कार्य करण्याची ऊर्जा मिळते.”

या सोहळ्याला नगरसेविका अनिताताई काटे, कुंदाताई भिसे, जयनाथ शेठ काटे, संदेश काटे पाटील, राजाभाऊ मासूळकर, अभिजित बोरसे, अमित नेमाणे, संदीपशेठ काटे, संजय शेठ भिसे, दिनेश काटे पाटील यांसह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित नागरिकांना ग्रंथाचे वितरण करण्यात आले.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!