news
रहाटणीत नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची धडक कारवाई! गजानन नगरमधील ‘डेथ ट्रॅप’ ठरणारी ड्रेनेज समस्या २४ तासांत केली गुलपिंपरी-चिंचवडमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ५ कोटींची फसवणूक करणारे आहेरकर कुटुंब नेवासामधून अटक! आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाईजागतिक बाजारात सोने गडगडले! स्पॉट गोल्ड ४,१६९ डॉलरवर; अमेरिकन व्याजदर आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार चिंतेतभारतातील म्युझिक इंडस्ट्रीला केंद्र सरकारचे मोठे गिफ्ट; ‘PPL India’ ला मिळाली अधिकृत कॉपीराईट सोसायटी म्हणून मान्यता!मोरवाडीत पिंपरी-चिंचवड भाजपचा भव्य नियुक्ती सोहळा; भुजबळ, नेमाने, भालेराव, मोरे आणि शिर्के यांच्यावर नव्या आघाड्यांची जबाबदारी!
Home पिंपरी चिंचवड तहसीलदार-नायब तहसीलदारांच्या ‘लॉगिन’चा गैरवापर? जात प्रमाणपत्र अन् उत्पन्नाच्या दाखल्यात अनियमितता; एसीबीच्या कारवाईनंतर महा ई-सेवा केंद्रांवर टांगती तलवार

तहसीलदार-नायब तहसीलदारांच्या ‘लॉगिन’चा गैरवापर? जात प्रमाणपत्र अन् उत्पन्नाच्या दाखल्यात अनियमितता; एसीबीच्या कारवाईनंतर महा ई-सेवा केंद्रांवर टांगती तलवार

तहसीलच्या 'सेतू' केंद्रातील कारभारावर प्रश्नचिन्ह! बोगस प्रमाणपत्रांच्या रॅकेटची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव; दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी. (@२०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love


पिंपरी-चिंचवड तहसील कार्यालयात ‘बोगस’ कागदपत्रांचा सुळसुळाट? बहुजन विकास आघाडी आक्रमक; १६ मार्चला ‘पोल खोल’ आंदोलनाचा इशारा


पिंपरी प्रतिनिधी आकाश कांबळे, ११ मार्च २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी/पुणे : पिंपरी-चिंचवड तहसील कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रामध्ये (SETU) बोगस कागदपत्रांच्या आधारे शासकीय प्रमाणपत्रे वितरित केली जात असल्याचा खळबळजनक आरोप बहुजन विकास आघाडीने केला आहे. या प्रकरणातील दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून सखोल चौकशी करण्याची मागणी करत, संघटनेने थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे.

पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जीतेन्द्र डुडी यांची भेट घेऊन यासंदर्भात तक्रारीचे निवेदन सादर करण्यात आले.

बहुजन विकास आघाडीने निवेदनात खालील गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत:

  • संशयास्पद प्रमाणपत्रे: जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला आणि प्रतिज्ञापत्र प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता होत असून सर्वसामान्यांची पिळवणूक केली जात आहे.

  • डेस्क एक्सेसची चौकशी: अपर तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांच्या डिजिटल स्वाक्षरीचा आणि लॉगिन एक्सेसचा वापर करून कोणत्या कागदपत्रांना मंजुरी दिली गेली, याची तांत्रिक तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

  • कारवाईची मागणी: शैलेश एकांबरी बासुतकर याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) कारवाई केल्याने, त्याच्या पत्नीच्या नावावरील महा ई-सेवा केंद्र आणि आधार मशीन कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

प्रशासनाने या प्रकरणातील दोषी अधिकारी, अव्वल कारकून आणि नागरी सुविधा केंद्रातील कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई न केल्यास, बहुजन विकास आघाडीने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

  • तारीख: सोमवार, १६ मार्च २०२६

  • ठिकाण: डॉ. बाबाहेब आंबेडकर उद्यान, पुणे (जिल्हाधिकारी कार्यालयासमोर)

  • प्रकार: एक दिवसीय “पोल खोल आंदोलन”

यावेळी संस्थापक अध्यक्ष संजय (नाना) धुतडमल, ज्येष्ठ मार्गदर्शक नानासाहेब कांबळे, प्रदेशाध्यक्ष मनोज क्षिरसागर, कोमलताई शिंदे, मिलिंद सोनवणे, ज्योतीताई कांबळे, अक्षय म्हात्रे, विजय कांबळे, कैलास कसबे आणि संदीप मोरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!